Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘शेल्टर’मधून नाशिकचेे ब्रँडिंग; क्रेडाई नाशिक गृहप्रदर्शन; प्रॉपर्टी खरेदीसाठी सुवर्ण काळ

Share

नाशिक । नील कुलकर्णी

नाशिकमध्ये स्थायिक होण्यासाठी शहराची उपयुक्तता, औद्योगिक विकास, शिक्षणासह इतर सुविधा यासह झपाट्याने विकसित होणारी नगरी म्हणून उदयास येत आहे. शहराची बलस्थाने, भविष्यातील प्रगती आणि विकास यांना अधोरेखित करणारे नाशिक गॅलरी प्रदर्शन ‘शेल्टर’चे आकर्षण ठरणार आहे. अनेक प्रकल्प बांधून पूर्ण झाल्यामुळे विविध योजना, सवलती यामुळे प्रॉपर्टी खरेदीसाठी हा सुवर्ण काळ ठरणार आहे.

क्रेडाई मेट्रो नाशिक आयोजित शेल्टर गृहप्रदर्शन दि. 19 ते 22 डिसेंबरदरम्यान गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर होत आहे. नाशिकसह ठाणे, मुंबईची उपनगरे कल्याण, डोंबिवली, घाटकोपरसह पुणे, उत्तर महाराष्ट्रातातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रदर्शनाची जाहिरात करण्यात येत असून तेथील ग्राहक तसेच नाशिकबाहेर नोकरी-व्यवसायनिमित्त स्थिरावलेल्या नाशिककरांना पुन्हा येथे आणण्यासाठी डिजिटल ब्रँडिंग यासाठीही खास प्रयत्न प्रदर्शनातून होणार आहेत. नाशिक गॅलरी हे प्रदर्शनाचे आकर्षक ठरणार असून नाशिकची वैशिष्ट्ये, महत्त्व, बलस्थाने अधोरेखित करणार्‍या प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञांच्या मार्गदर्शनात ‘डिस्ले’ उभारण्यात येणार आहे.

प्रदर्शनात रियल इस्टेटशी संबंधित स्टॉलसोबतच बँक, अर्थसहाय्य करणार्‍या संस्था, बांधकामासाठी पूरक ठरणार्‍या उत्पादनांसह अंतर्गत सजावट आदी कंपन्यांसह एकूण 130 हून अधिक स्टॉॅल्स सहभागी होणार आहेत. त्यामध्ये 60 हून अधिक स्टॉल्स बांधकाम व्यावसायिकांचे असतील तर बांधकामपूरक उत्पादनांचे 46 स्टॉल्स असणार आहेत. गृहकर्ज करणार्‍या संस्थांचे 14 ते 17 स्टॉल्स ग्राहकांना वित्तीय सेवा तसेच मार्गदर्शन करतील.

शेल्टरमध्ये प्रॉपर्टी खरेदीसाठी ग्राहकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. रेरामुळे रिअल इस्टेटला इंड्रस्टीचा दर्जा मिळाला आहे. बांधकाम व्यावसायिक पूर्वी पारंपरिक पद्धतीने काम करत परंतु रेरामुळे या व्यवसायात स्थित्यंतरे झाली आहेत. नवीन तंत्रज्ञान, माध्यमे यातून व्यावसायिकांनी कशा सेवा दिल्या पाहिजे यांचा परिपूर्ण ‘डिस्पे’ प्रदर्शनात असणार आहे. एकूणच गृहस्वप्नपूर्ती देण्यासह विकास, रोजगार आणि ब्रँडिंगवर भर देणारे हे प्रदर्शन सर्वार्थाने अभिनव ठरणार आहे.


खरेदीसाठी सर्वोत्तम वेळ

नाशिकमध्ये प्रॉपर्टीसाठी अत्यंत पोषक काळ आहे. अनेक गृहप्रकल्प पूर्ण झाले आहेत. जीएसटीही एक टक्याने कमी करण्यात आला. शिवाय गृहकर्ज अधिक स्वस्त झाले असल्याने स्थावर संपत्तीसाठी हीं सर्वोत्तम वेळ आहे. काही प्रकल्पात जीएसटीशिवाय घर घेण्याची संधी आहे. विकासकांनी अनेक मोठ्या योजना, सवलती देऊ केल्या आहेत. नजिकच्या भविष्यात घरांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत.

– उमेश वानखेडे, अध्यक्ष, के्रडाई नाशिक मेट्रो


रोजगारनिर्मिती

के्रडाई नाशिक सदस्यांसह येथील निमा, आयमा, डॉक्टरांसह आर्किटेक्ट संघटना यांसारख्या अनेक संस्थांना प्रदर्शनात सहभागी करून घेत आहोत. एकाच छताखाली घरापासून ते सजावटीपर्यंतचे सर्व स्टॉल्स, मार्गदर्शन येथे उपलब्ध होईल. यासह व्याख्याने, चर्चासत्र, विविध भरगच्च आणि विधायक उपक्रम शेल्टरमध्ये होणार आहेत. एकूणच रिअल इस्टेट प्रदर्शनाच्या माध्यमातून शहरात रोजगारनिर्मिती, विकास यावर काम करत आहोत.

– कृणाल पाटील, रवी महाजन
सहसमन्वयक, शेल्टर-2019

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!