Type to search

Breaking News जळगाव

शेगाव बस आगाराला मिळाली अत्याधुनिक ब्रेक डाऊन व्हॅन

Share

नादुरुस्त बस काही वेळेतच होणार दुरुस्त, प्रवाशांचा त्रास कमी होणार

शेगाव – दिपक सुरोसे

शेगाव बसस्थानकामध्ये सर्व सुविधा युक्त सुसज्ज अशी ब्रेक डाऊन व्हॅन दाखल झाल्यामुळे प्रवाशांचा त्रास कमी होण्यास मदत मिळणार आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक तीर्थस्थळ असलेल्या विदर्भ पंढरी म्हणून विख्यात संतनगरी शेगाव येथे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्या सह भारतातील विविध प्रांतातून श्रींच्या दर्शना निमित्त दररोज हजारो प्रवासी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करून शेगावला येत असतात.

अशातच बरेचदा राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अर्ध्या

रस्त्यातच नादुरुस्त होऊन प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने रायगड जिल्ह्यात अत्याधुनिक सर्व सुविधांनी सुसज्ज अशी ज्याला आपण संजीवनी म्हणूनही बोलू शकतो. अशी ए टू झेड सर्व प्रकारचे साहित्य असलेली तसेच दोन टायर नेहमी सोबत ठेवणारी ही ब्रेक डाऊन व्हॅन शेगाव बस आगारसह जिल्ह्यात मेहकर आणि चिखली येथील बस आगारला प्राप्त झालेली आहे.

शेगाव बस आगारात आगारात कार्यरत चालक विलास पुरी यांनी रायगड ही ब्रेकडाऊन रूट बुलढाणा येथे आणली जवळपास सहा दिवसांचा प्रवास पूर्ण करून सर्वप्रथम ही व्हॅन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा येथील विभागीय मंडळ कार्यालय येथे आणण्यात आली. तेथून मंगळवार दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास विलास पुरी हे ही व्हॅन घेऊन शेगाव बस स्थानक परिसरात आले. यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या शेगाव आगार व्यवस्थापक सुभाष भिवटे अशोक देशमुख तसेच शेगाव बस स्थानक प्रमुख एन एस उर्फ नाजुकराव देशमुख यांनी सर्वप्रथम या बसची पूजा अर्चना केली.

अत्याधुनिक आणि सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या या ब्रेक डाऊन व्हॅन मध्ये हवा मशीन होल करण्याची मशीन जनरेटर टॉमी जॉब ए टू झेड पर्यंतचे सर्व प्रकारचे पाने टोचन इत्यादी सह दोन टायर सुद्धा या वेळांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्यामुळे एखादी बस रस्त्यामध्ये नादुरुस्त होऊन बंद पडल्यास काही वेळातच ही ब्रेकडाऊन व्यान त्याठिकाणी जाऊन नादुरुस्त बस दुरुस्त करणार त्यामुळे बसमधील प्रवाशांना होणारा त्रास काहीवेळातच दूर होईल प्रवासी पुढील मार्ग घेण्यासाठी त्याच बसचा प्रवास करू शकतील अशी माहिती शेगाव बस स्थानक प्रमुख नाजुकराव देशमुख यांनी दिली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!