Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

चिखली येथील जामवंती नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या चार तरुणांचा बुडून मृत्यू

Share

शेगाव : दिपक सुरोसे

पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांचा चिखली येथील जामवंती नदीन बुडून मृत्यू सदर घटना आज दुपारी १ वाजता चिखली शहरात घडली. या दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या मृतक युवकांची पोलीस सूत्रांनी दिलेली नावे खालीलप्रमाणे आहेत.

1) शे.साजीद शे.शफीक, 2) वासीम शाह इरफान शाह, 3) शे.तौसीफ शे.रफिक, 4) वसीम शाह इरफान शाह, अशी या मृत पावलेल्या युवकांची नावे आहेत.

हे चौघेही चिखली जेथील अंगूरच्या मळ्यात वार्ड क्रं १० येथील रहिवासी असून आज दुपारी १ वाजता शहरातील मध्य भागी असलेल्या जुन्या गावातील जामवंती नदीवर पोहण्यासाठी गेले असता नदीच्या पात्रात उतरल्यानंतर पोहोण्याचा आनंद घेत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने आणि जास्त गाळ

 

असल्यामुळे ते बुडायला लागले.

हे चौघे बुडत असल्याचं पाहून, वरुन पाहत असलेल्या त्यांच्या सोबत असलेले २ युवकांनी आरडाओरडा व धावपळ करून आपल्या मित्रांना वाचवण्यासाठी लोकांना बोलावले जुन्या गावातील १० ते १२ युवकांनी त्याच्या मदतीसाठी धाव घेतला आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तब्बल १ ते दीड तासा पर्यंत त्या चौघांचा पाण्यात शोधा शोध घेतला अस्ता आखीर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि चौघांचे शरीर पाण्यातून बाहेर कडण्यात आले.

त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ्टरांनी चौघांनाही मृत घोषीत केले पुढील तपास चिखली पोलिस निरीक्षक गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलिस उप निरीक्षक सचिन चव्हाण हे करीत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!