Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

किरकोळ कारणावरून शेडगाव येथे सख्ख्या भावाला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न

Share

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील शेडगाव याठिकाणी किरकोळ कारणावरून शरद मारुती भदे याने गोरख मारुती भदे या सख्या भावाला बुधवारी पहाटे घरामध्ये कोंडून घराला आग लावून जिवंत जाळून व गुप्तीने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शरद मारुती भदे व रूपाली शरद भदे यांच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

तालुक्यातील शेडगाव या ठिकाणी शरद मारुती भदे व गोरख मारुती भदे हे दोन सख्खे भाऊ शेजारी शेजारीच भदेवस्तीवर राहत असून काही दिवसापासून त्यांच्यात शेतीचा वाद सुरू होता. त्यातूनच दिनांक 26 ऑगस्ट रोजी विहिरीवरील मोटारीचा विजेचा आकडा काढण्याच्या किरकोळ कारणावरुन दोन्ही सख्ख्या भावांमध्ये भाङण झाल होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र लहान भाऊ शरद याने मा़झ्याविरोधी पोलिसात तक्रार का केली याचा राग आल्याने काल दिनांक 28 ऑगस्ट रोजी त्याने सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोरख मारुती भदे याच्या छपराच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद करून कढी लावली व ते घरात झोपले असताना घराला आग लावून दिली . आग काही वेळातच मोठ्या प्रमाणात पसरली. झोपेत असलेले गोरख व त्याची पत्नी सुरेखा यांच्या लक्षात आले की आपल्या घराला आग लागली आहे.

त्यांनी दरवाजा तोडून बाहेर येण्यासाठी मोठ्या प्रमाणात आरडाओरडा केला. मात्र बाहेरून दरवाजाला कडी लावली असल्याने दरवाजा लवकर त्यांना तोडता आला नाही त्यातच आगीने भीषण रूप धारण केल्याने दरवाजा जळल्याने ते बाहेर निघाले. मात्र घराच्या बाहेर निघाल्यानंतर दारात त्यांचा छोटा भाऊ शरद हा हातामध्ये गुप्ती घेऊन उभा होता. त्याक्षणी गोरख हा जळालेल्या अवस्थेत बाहेर आल्या असताना लगेच शरद याने पाठीवर व पोटावर वार केले. गोरख याची पत्नी सुरेखा सुद्धा मोठ्या प्रमाणात आगीमध्ये भाजली. दोघेही जखमी अवस्थेत बराच वेळ प्रांगणात पडून होते. नंतर त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारीपाजारी त्या घटनास्थळी पोहोचले. घडलेला प्रकार पाहून त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत नागरिकांनी आपत्कालीन सेवा 108 ला फोन करून रुग्णवाहिकेला बोलावून त्यांना उपचारासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र गोरख याची परस्थिती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी शरद मारुती भदे व त्याची पत्नी रूपाली शरद भदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सतीश गावित हे करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!