त्र्यंबकला रुग्णालय व्हावे ही होती शशी कपूर यांची इच्छा

त्र्यंबकवासियांनी जागवल्या आठवणी

0
त्र्यंबकेश्वर । हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे 79 व्या वर्षी निधन झाले. शशी कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर नियमित त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी यायचे. त्याच्यासोबत प्रसिद्ध अभिनेते राज कपूर, शमी कपूर, शमी कपूर हेदेखील याठिकाणी यायचे.

त्र्यंबकेश्वर ही संतांची भूमी आहे. येथील कुंभमेळ्यासाठी जगातील करोडो भाविक दर 12 वर्षांनी भेटी देतात. तसेच याठिकाणचा निसर्ग आरोग्यासाठी लाभदायी आहे. अनेक दुर्धर आजाराचे रुग्ण अशा हवामानात वावरले तर ते लवकर बरे होतील.

त्यानंतर कपूर यांनी तत्कालीन नगराध्यक्ष स्व. उगले यांची भेट घेऊन याठिकाणी भव्य रुग्णालय असायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र ते होऊ शकले नसल्याने आजही दिवंगत अभिनेते शशी कपूर यांचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.

पृथ्वीराज कपूर यांच्या निधनानंतर शशी कपूर यांनी 30 वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वरला भेट दिली होती. त्यावेळच्या छोटेखानी भाषणात ते म्हणाले होते की, येथील निसर्ग खूप निसर्गरम्य आहे. मलाही याठिकाणी नेहमी यायला आवडेल. इथे राहणारे नागरिक खूप नशीबवान आहेत असे म्हणत त्यांनी सर्व त्र्यंबकवासियांचे आभार मानले होते.

त्र्यंबकेश्वरमध्ये त्याकाळी सामान्यांच्या मनोरंजनासाठी काही सोय नव्हती. त्यामुळे तत्कालीन नगराध्यक्ष स्व. केशवराव उगले यांनी गावात 24 सार्वजनिक दूरदर्शन संच बसवण्याचे काम हाती घेतले होते. त्यातील कुशावर्तावरील एक टीव्ही संचाचे उद्घाटन दिवंगत अभिनेते शशी कपूर यांच्या हस्ते झाले होते. तेव्हा त्र्यंबकेश्वरवासियांनी केलेल्या अगत्यशील आदरातिथ्याने दिवंगत कपूर भारावले होते.

आजही कपूर घराण्याच्या संपूर्ण वंशावळी त्र्यंबकेश्वर येथील पुरोहितांकडे पहावयास मिळतात. केवळ कपूरच नव्हे तर अनेक दिग्गज कलाकार आणि राजकीय नेत्यांच्या वंशावळी येथे उपलब्ध असल्याचे सांगितले जाते.

LEAVE A REPLY

*