PHOTOS : शशांकने कोणासाठी गुणगुणलं गाणं?

0
आजकाल प्रत्येक व्यक्ती सोशल मीडिया ऍक्टिव्ह राहताना दिसत असतो , आणि अभिनेते तरी ह्यापासून मागे का राहतील ? सोशल मीडिया वर सिने अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या प्रत्येक गोष्टीबद्दल अपडेट आपल्या  चाहत्यांना देत असतात .
होणार सून मी ह्या घरची मध्ये सर्वांच्या घराघरात पोहचलेला शशांक केतकर आजकाल जास्तच चर्चेत दिसत आहे ते म्हणजे त्याच्या सोशल मीडिया च्या पोस्ट वरून. त्याच्या सोशल नेटवर्किंग साईट्स वर सध्या एक फोटो वायरल होताना दिसत आहे , त्यात तो त्या मुलीसोबत एक रँडम पोज देताना दिसत आहे .
व्हॅनिप्रोजेक्ट टी वन जवळ काढलेला हा फोटो सध्या खूप नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे . अखेर हि मुलगी आहे कोण ?
शशांक सोबत झळकणारा हा सुंदर चेहरा आहे अभिनेत्री रीना अग्रवाल हिचा ! टेलिव्हिजन मधून आपल्या करियरची सुरुवात करणारी रीना हिला नेहमीच दमदार अश्या भूमिका मिळत आल्या मग तो क्या मस्त है लाईफ मधील रिया असो , वा एजन्ट राघव मधील डॉक्टर आरती ची भूमिका असो ; प्रत्येक पैलू मध्ये रीना अतिशय वेगळीच दिसत आली आहे . रीना ने बॉलिवूड प्रमाणेच मराठी चित्रपट केलेले आहे , आमिर खान”च्या  तलाश  पासून मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच ” सोनाली कुलकर्णी “च्या अजिंठा ह्या चित्रपटांमध्ये रिना ला अभिनयाची संधी मिळाली.
सोशल मीडिया हा अभिनेता आणि फॅन्स मधील दुआ आहे आणि हीच गोष्ट अतिशय चांगल्या रीतीने समजलेल्या शशांक ने आपल्या सोशल नेटवर्किंग साईट्स वर रीना सोबत चा एक फोटो पोस्ट करून आपल्या या प्रोजेक्ट मध्ये आपल्या सोबत असणारी नवी अभिनेत्री अशी ओळख करून दिली आहे.
आता कुतुहुलता हि आहे की हा नवा प्रोजेक्ट नक्की असणार काय ह्याची !

LEAVE A REPLY

*