Type to search

Featured हिट-चाट

शाहरुखनं चित्रपटांतून ब्रेक घेतल्यामुळं पत्नी गौरी खुश

Share

मुंबई : झिरो सिनेमानंतर अभिनेता शाहरुख खान याने एकाही नव्या सिनेमाची घोषणा केलेली नाही. या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर त्याचे चाहते त्याला मिस करणार आहेत. शाहरुख म्हणालाय की आता त्याला ब्रेकची गरज आहे आणि तूर्त तो एकही सिनेमा करत नाही. फॅन्स शाहरुखच्या या निर्णयामुळे निराश असले तरी त्याची पत्नी गौरी मात्र खूप खुश आहे. गौरीने एका मुलाखतीदरम्यान शाहरुखच्या ब्रेकबाबत सांगितले. गौरीने सांगितले की, मला वाटतं याची गरज होती. मी खूप खूश आहे, कारण आता मी बाहेर ये-जा करू शकते आणि तो घरात राहील. तो आता अबरामची चांगली काळजी घेईल. मी खूपच एक्सायटेड आहे. जर मी अबरामसाठी नसेन तर शाहरुख असेल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!