Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या हिट-चाट

विरुष्काला मुल झालं तर मीडिया तैमुरला दाखवणे बंद करेल; सासू शर्मिला टागोर यांच्या प्रश्नावर करीना कपूर म्हणते…

Share

विरुष्काला मुल झालं तर मीडिया तैमुरला दाखवणे बंद करेल; सासू शर्मिला टागोर यांच्या प्रश्नावर करीना कपूर म्हणते…

देशदूत डिजिटल विशेष

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

देशात सेलिब्रेटींचा मागोवा घेत अनेकदा सोशल मीडियात गोष्टी बाहेर येतात. आघाडीची अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ आली खान यांचे गेल्या काही वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यानंतर लग्नाचे फोटो दाखविण्यापासून आजवर अनेकदा करीना कपूरचे घराणे प्रकाशझोतात आले आहे.

अलीकडेच करीनाची सासू ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी करीनासोबत रेडियो इश्क या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी यावेळी तैमुर अली खानवर बरीच चर्चा रंगली. यामध्ये शर्मिला टागोर यांनी करीनाला केलेल्या एका प्रश्नावर म्हटले की तैमुर झाल्यानंतर सर्वत्र तैमुरला मिडीयाने उचलून धरले होते. आजही अनेकदा बातम्या येत असतात तसेच चर्चा होत असतात.

पुढे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना जर मुल झाल तर मीडिया तैमुरला प्रसिद्धी देणार नाहीत. किंवा प्रसिद्धी कमी करतील. यावर करीना म्हणाली की, असे व्हायला हवे.

पुढे शर्मिला टागोर म्हणाल्या की, सून आणि मुलगी यात फरक काय? यावर करीना म्हणाली की, मुलगी जी जिच्यासोबत आपण मोठे झालो आहोत. बरोबर ना! असे उत्तर देऊन यावर सर्वांचीच मन करीनाने जिंकली.

पुढे करीना म्हणाली, आपण आपल्या सुनेला तेव्हा भेटतो जेव्हा ती मोठी झाली असते. तिच्या आवडीनिवडी माहिती नसतात. तिचा स्वभाव माहिती नसतो. त्यामुळे सुनेला घरातल्या गोष्टी माहिती व्हायला वेळ लागतो. जेव्हा एक नवीन मुलगी आपल्या घरी येते आहे तर अशावेळी सासरच्या मंडळीने तिचे उत्स्फूर्त स्वागत केले पाहिजे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!