Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

सेन्सेक्सची विक्रमी उसळी; प्रथमच ४१ हजार पार

Share

मुंबई  | प्रतिनिधी 

राजकीय घडामोडींनी वेग घेतला असतानाच अचानक आज सकाळी शेअर बाजाराने उसळी घेतलेली बघायला मिळाली.  सेन्सेक्स आज सकाळी व्यवहार सुरू होताच ४१ हजार २२.८५ अंकांवर खुला झाला. गेल्या अनेक दिवसांपासून पहिल्यांदाच सेन्सेक्स ४१ हजार अंक पार करून उघडला. तिकडे निफ्टी ३६.४५ अंकांनी वाढून १२, ११०.२० अंकांवर खुला झाला.

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार संबंध सुधारण्याच्या अपेक्षा उंचावल्या असल्यामुळे कालपासून आशियाई बाजारात तेजी दिसून येत आहे. तर दुसरीकडे राजकीय घडामोडीनी वेग घेतल्यामुळे सेन्सेक्स वधारला असल्याचे बोलले जात आहे.

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या ज्या समभाग खरेदीत गुंतवणुकदारांचा कल दिसून आला. यामध्ये येस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, ओएनजीसी आणि सन फार्मा यांचा समावेश असलेला दिसून आला.

तसेच भारती एअरटेल, पावरग्रीड, बजाज ऑटो, अॅक्सिस बँक आणि एलअँडटी यांच्या समभागांमध्ये मात्र घसरण बघायला मिळाली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!