समान्यांच्या हिताला मोदी सरकारकडून बाधा

0

पवार यांचा आरोप : शेतकरी जगला पाहिजे

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – शेजारच्या अनेक देशात हुकुमशाही असताना आपली लोकशाही टीकून आहे. मात्र सामान्य माणसाच्या हिताला बाधा आणण्याच काम देशात पहिल्यांदाच सुरु झाले. देशाच्या सत्तेची सूत्रे नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्यामुळे हे सर्व होत असून यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. केवळ जाहिरातबाजी करणारे हे सरकार आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शेवगाव येथे ते बोलत होते. पवार म्हणाले, पिकवणारा शेतकरी जगला तर खाणारा जगेल, असा विचार आधीचे मनमोहनसिंग सरकार करत होते. आताचे मोदी सरकार फक्त खाणार्‍यांचा विचार करत आहे. भाजपा सरकारने अनेक निर्णय घेऊन त्याची जाहिरातबाजी केली.

परंतु सामान्यांच्या पदरात काहीच पडले नाही. मोठा गाजावाजा करत गॅस दिल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात सिलेंडरच्या किमती तीन पटीने वाढल्या. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्य करता मग शिवस्मारकात गेल्या चार वर्षात एकही वीट का उभी राहिली नाही? पंतप्रधान मोदी यांनी गेल्या 55 महिन्यात 92 वेळा परदेश वार्‍या करून 2021 कोटी रुपये विमान प्रवासावर खर्च केले, असा आरोप त्यांनी केला. राफेल, नोटाबंद, जीएसटी अशा विषयांवरून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.

लुंग्यासुंग्यांना घाबरत नाही
शरद पवार मोदींवर टीका करताना आक्रमक झाले आहेत. मोदी सरकार आधी गांधी घराण्याला शिव्या घालत होते. नंतर नेहरूंनाही त्यांनी शिव्या घातल्या. आता त्यांचा मोर्चा माझ्याकडे वळला आहे. पण मी महाराष्ट्राचा मर्द माणूस आहे. मी कोणा लुंग्यासुंग्यांना घाबरत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*