Type to search

Featured maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आघाडीची मॅरेथॉन बैठक

Share

नवी दिल्ली- राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ येथील निवासस्थानी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही सायंकाळी साडेपाच वाजेपासून ही बैठक सुरू आहे. बैठकीस दोन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती आहे. या बैठकीत राज्यातील सत्तापेचावर तोडगा काढण्याचा अंतिम निर्णय होणार असल्यांची शक्यता आहे असे सूत्रांनी सांगितले.

आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू झाली आहे. याबैठकीला स्वत: पवारही उपस्थित आहेत. त्याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश, केसी वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, नवाब मलिक आदी नेते या बैठकीला उपस्थित आहेत.

गेल्या दोन तासापासून हि मॅरेथॉन बैठक सुरू आहे. संपुर्ण राज्याचे लक्ष या बैठकीकडे लागले आहेत. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार आहेत हे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!