Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

‘रयत’ दुकानदारी करणारी संस्था नाही

Share

शरद पवार : कर्जत-जामखेडमधून नव्या पिढीची उभारणी करा

जामखेड (तालुका प्रतिनिधी) – गरिबांच्या घरी ज्ञानाचा दीप लावण्यासाठी उभी हयात खर्ची घालणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावलेले रयत शिक्षण संस्थेचे रोप आज आशियातील एक नंबरची संस्था आहे. शिक्षण घेण्याची ताकद नसणार्‍यांसाठी ही संस्था आहे. रयत शिक्षण संस्था शिक्षणाचा बाजार करणारी संस्था नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी केले. जामखेडमधून नव्या पिढीची उभारणी करा, असे आवाहनही त्यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या जामखेड येथील श्री नागेश विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे, दादाभाऊ कळमकर, रामदास फुटाणे, युवा नेते रोहित पवार, चेअरमन अरुण कडू, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, राज्य सरचिटणीस राजेंद्र कोठारी, मतदारसंघ प्रमुख प्रा. मधूकर राळेभात, मीनाताई जगधने आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, शेतीप्रधान देशात शेती व शेतकर्‍यांसाठी काम करतांना राजकारण करू नका. शेती विषयात काम करणार्‍या मोठ्या संस्थांच्या मदतीने कर्जत-जामखेडचा दुष्काळ हटविण्यासाठी माझी तयारी आहे. त्यासाठी या भागातून नव्या पिढीची उभारणी करायची आवश्यकता आहे. शेतीचे व पाण्याचे तज्ज्ञ या भागात कसे येतील, यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. बारामती कृषी विज्ञान केद्राच्या माध्यमांतून शेतकर्‍यांना नवी दृष्टी देण्याचे काम सुरू आहे.

रोहीत पवार म्हणाले, रयत शिक्षण संस्थेची सुरूवात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मोठया ध्येयाने सुरू केली. आज या संस्थेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थथ्यांची संख्या पाच लाखांवर आहे. जामखेडच्या राऊत कुटुंबाची जागा देण्याचे दातृत्व भावना मोठी आहे. बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी ग्रामीण भागातील शाळांना ताकद देण्याचे काम शरद पवार यांनी सातत्याने केले. लवकरच जामखेड, कर्जत भागात अधुनिक करिअर प्लॅँनिग शिक्षण सूरू करणार आहे. नोकरी मार्गदर्शन मेळावा, स्कील डेव्हलपमेंटमधून नोकरीसाठी मार्गदर्शन, मुलींसाठी स्वतंत्र अ‍ॅकेडमी, असे उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यावेळी वळसे पाटील, प्रा. मधुकर राळेभात यांचे भाषण झाले. प्रस्ताविक ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यंनी केले. प्रा. सरसमकर यांनी आभार मानले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!