Type to search

maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

आम्ही म्हणजेच काँग्रेस, गांधी परिवाराच्या या भूमिकेमुळे काँग्रेस टिकणार नाही – शरद पवार

Share

मुंबई – काँग्रेसचा सिमेंटिंग फोर्स गांधी फॅमिली आहे. गांधी परिवार हा या सगळ्यांना एकत्र ठेवतो. त्यामुळे हा परिवार वगळून काँग्रेस टिकणार नाही. आणि गांधी परिवारानेही आम्ही म्हणजेच काँग्रेस ही भूमिका घेऊनही काँग्रेस टिकणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले, पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसमुक्त भारत हा अजेंडा देशाला घातक आहे. काँग्रेसचे पुनरुज्जीवन होणे ही देशाची गरज आहे. केवळ काँग्रेस पुनरुज्जीवित करताना काँग्रेसची जी मूळ परंपरा आहे, त्या परंपरेत काँग्रेस चालविण्याची नीतिमत्ता नेतृत्वाने आणि सहकार्‍यांनी घेतली पाहिजे. अशा परिस्थितीत काँग्रेस पुनरुज्जीवित करणे आणि ती शक्तिशाली बनविणे, ही राष्ट्रीय गरज आहे. याबाबत राहुल गांधी यांच्याशी आम्ही चर्चा सुरू केली आहे. त्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे पवार यांनी सांगितले. पुन्हा सगळे काँग्रेसवाले एकत्र येणार का? या प्रश्नावर नाही, असे उत्तर पवार यांनी दिले. अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. लोकच असे बोलत आहेत. पण तसा कोणताही ठोस प्रस्ताव नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!