कळवणच्या रायफल शुटर्सची राष्ट्रीय पातळीवर निवड

0

कळवण | १७ ते २० ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्र रायफल असोशिएशनच्या वतीने मुंबई येथे महाराष्ट्र एअर वेपन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेसाठी शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या आदित्य पाटील, संकेत  पगार, यश मंडलिक  व शिनगर शुभम या चार रायफल शूटर्सने राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे.

 

 

या विद्यार्थ्यांनी एअर पिस्तोल, पिप साईट एअर पिस्तोल व ओपन साईट एअर पिस्तोल १० मीटर या प्रकारात आपले कौशल्य दाखवले.

या सर्व विद्यार्थ्यांची निवड ऑल इंडिया कुमार सुरेंद्र सिंग इंटरस्कुल शुटींग (ज्यू.नॅशनल) स्पर्धेसाठी करण्यात आलेली आहे. त्यांच्या या उज्ज्वल कामगिरीसाठी त्यांना शाळेचे रायफल शुटींग प्रशिक्षक देविदास सुडके यांचे मार्गदर्शन लाभले.

मीनाक्षी जे. पवार, शाळेचे चेअरमन शैलेश पवार, शाळेचे सचिव अनुप पवार, स्कूल कमिटीचे अध्यक्ष विलास शिरोरे, गजानन सोनजे, शाळेचे प्राचार्य बी. एन. शिंदे, ज्यू. कॉलेजचे प्राचार्य जे. एल. पटेल, समन्वयक विश्वेस्वरन यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

*