Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

Video : युतीत सडले तरी एकत्र लढले; शिवसेनेची गोची, कॉंग्रेस, राष्ट्रवादी विरोधी बाकावरच बसणार – पवार

Share

मुंबई | प्रतिनिधी

लवकरात लवकर सत्ता स्थापन होण्याची गरज आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. आम्ही विरोधी बाकावर बसणार आहोत. यामुळे राष्ट्रवादीची भूमिका बदलली असून याचा शिवसेनेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवसेनेची यामुळे गोची झाल्याचे बोलले जात आहे. शरद पवार पत्रकार परिषदेत संवाद साधत आहेत.

पवार म्हणाले, संजय राऊत कुठलाही प्रस्ताव घेऊन आपल्याकडे आले नव्हते. राज्यातील जनतेने शिवसेना भाजपला कौल दिला आहे, त्यामुळे सत्तेत येण्याचा प्रश्नच येत नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यात पुढे प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहे.

कॉंग्रेस पक्षाने राज्यातील सत्तेबाबत काय निर्णय घेतला हे अद्याप मला माहिती नाही. आमच्याकडे सत्तास्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ नाही त्यामुळे आम्ही सत्तेत येण्याचा प्रश्नच येत नाही. शरद पवार मुख्यमंत्री होणार या निव्वळ अफवा आहेत.

शिवसेना भाजपची गेल्या २५ वर्षांची युती आहे. युती सडली असे म्हणत असले तरी दोन्ही पक्षांनी निवडणुका एकत्र लढल्या आहेत. त्यामुळे शिवसेना भाजपने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकत्रित निर्णय व्हावा. लोकांनी आमचे जास्त आमदार निवडून दिलेले नाहीत, त्यामुळे लोकांनी जो कौल दिला आहे तोच कौल मानून आम्ही विरोधी पक्षातच बसणार आहोत.

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

राष्ट्रपती राजवटीची फक्त शिवसेनेलाच भीती

दिल्ली पोलिसांवरील हल्ले म्हणजे पोलिसांचे मनोबल ढासळल्याचे काम पूर्णपणे चुकीचे

नुकसानग्रस्त भागाला मदतीची गरज आहे, शेतकऱ्यांना धीर देण्याची ही वेळ आहे.

विमा कंपन्यांची भेट घेऊन त्वरित मदत मिळाली

शेतकऱ्यांना विमा मिळत नसेल तर विमा कंपनीला सरकारने सूचना कराव्यात

अयोध्या आणि बाबरीप्रकरणी काहीही निर्णय लागला तरी कायदा हातात घेऊ नका

अयोध्या प्रकरणातील निकालानंतर शांतता राखा

कॉंग्रेस राष्ट्रवादीवर जबाबदार विरोधी पक्ष म्हणून कौल दिला आहे. आम्ही विरोधी बाकावरच बसू.

संजय राऊत कुठलाही प्रस्ताव घेऊन आले नव्हते.

रब्बीसाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावीत.

चार वर्षे मुख्यमंत्री पद भूषवले आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा नाही.


१०५ ज्यांचा आकडा आहे त्यांनी सरकार बनवावं 

शरद पवार यांनी राजकीय अस्थिरतेवर बातचीत केली आहे. शरद पवार विरोधी बाकावर बसणार आहेत तर ठीक आहे ज्यांचे राज्यात १०५ आमदार आहेत त्यांनी सरकार स्थापन करावे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

 

Posted by Nationalist Congress Party – NCP on Tuesday, 5 November 2019

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!