Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शरद पवार यांनी देवळालीत केला पोळा साजरा

Share

देवळाली प्रवरा (वार्ताहर) – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुक्रवारी सकाळी अचानक भारतीय जनता पार्टीचे नगर जिल्ह्यातील नेते व माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या देवळाली प्रवरा येथील निवासस्थानी भेट दिल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला वेग आला आहे.
सध्या सर्वत्र विधानसभेचे वारे वाहू लागले असल्याने सर्वच पक्ष येणारी पुढील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत तसेच मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्याचा दौरा सुरू केला असून दौर्‍या दरम्यान राहुरी येथून श्रीरामपूर या ठिकाणी जात असताना देवळाली प्रवरा येथील चंद्रशेखर कदम यांच्या घरी अचानक भेट दिली. भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याने झालेली चर्चा गुलदस्त्यातच आहे.

याबाबत राहुरी विधानसभेसाठी भाजपकडून स्पर्धेत असलेले चंद्रशेखर कदम यांचे सुपुत्र सत्यजित कदम यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले, हा कुठलाही राजकीय दौरा नसून आमचे कदम घराण्याचे व पवार घराण्याचे नातेसंबंध असल्या कारणाने श्रीरामपूर याठिकाणी बैठकीसाठी जात असताना रस्त्यावरच देवळाली प्रवरा हे गाव लागते. त्यामुळे पवार यांनी आमच्या घरी येण्याचे ठरविले. तसेच आल्यावर कुठलीही राजकीय चर्चा न होता परिवाराची विचारपूस करण्यासाठी त्यांनी काही वेळ आमच्या घरी दिला. त्यामुळे प्रसार माध्यमांमधून लावले जात असलेले तर्कवितर्क यामध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!