शरद पवार उद्या जिल्हा दौर्‍यावर

0

अभंग यांच्या आत्मचरित्राचे होणार प्रकाशन

 

भेंडा (वार्ताहर) – माजी केंद्रीय कृषीमंत्री पद्मविभूषण शरदचंद्र पवार उद्या शनिवारी जिल्हा दौर्‍यावर येत असून भेंडा येथील ज्ञानेश्‍वर कारखाना कार्यस्थळावर माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे ‘शेतमळा ते विधानसभा’ आत्मचरित्राचे प्रकाशन त्यांच्या हस्ते होणार आहे.

 

 

भेंडा येथे शनिवार दि. 29 रोजी सकाळी 10 वाजता ज्ञानेश्‍वर कारखान्यावर होणार्‍या कार्यक्रमात भारत सरकारचा पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल व संसदीय कारकिर्दीस 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शरदचंद्र पवार यांचा व माजी आमदार पांडुरंग अभंग यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन नागरी सत्कार सोहळ्याचे निमंत्रक माजी आमदार नरेंद्र घुले पाटील व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले आहे.

 

 

सत्कार साहित्य आणू नये
नगर जिल्ह्यातील तमाम जनतेच्यावतीने माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार व माजी आमदार पांडुरंग अभंग यांचा एकच सत्कार होणार आहे. तरी कार्यक्रमास येताना कोणीही सत्कार साहित्य आणू नये असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.

LEAVE A REPLY

*