पानसनाला सुशोभिकरण लवकरच पूर्ण करण्याचा मानस ; शंकरराव गडाख

0

 बालब्रम्हचारी महाराज यांना ‘शनिरत्न’ प्रदान

शनिशिंगणापूर (वार्ताहर)- पानसनाला सुशोभिकरण काम स्व. बानकर भाऊंच्या 15 व्या स्मृतीदिनाच्या अगोदर पूर्ण करुन त्यांना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली वाहण्याचा आमचा मानस असून देवस्थानने हे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केले.
शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष स्व. बाबुराव बानकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा शनिरत्न पुरस्कार प्रदान करताना ते बोेेेलत होते. यावेळी महंत स्वामी सागरानंद सरस्वती, शिवाजी महाराज देशमुख, जंगले महाराज शास्त्री, विश्‍वासराव गडाख उपस्थित होते.
शंकरराव गडाख म्हणाले, शनैश्‍वर देवस्थानचे अध्यक्ष स्व. बाबुराव बानकर (भाऊ) यांनी 40 वर्षे शनिदेवाची मनोभावे सेवा करून देवस्थानला जागतिक किर्ती मिळवून दिली. अशा आदर्श पुरुषाच्या स्मरणार्थ पुरस्कार ठेवणे ही भूषणावह बाब आहे. यावर्षी शनिरत्न पुरस्कारासाठी श्रीसिद्धेश्‍वर देवस्थानचे महंत 1008 बालब्रम्हचारी महाराज यांची केलेली निवड योग्य आहे. मनाला शांती असल्याशिवाय क्रांती होत नाही. शनैश्‍वर देवस्थानने हाती घेतलेल्या पानसनाला सुशोभिकरण विकासाचे काम बानकर भाऊंच्या 15 व्या स्मृतीदिनाच्या अगोदर पूर्ण करून त्यांना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली वाहण्याचा आमचा मानस आहे. त्यादृष्टीने देवस्थान ट्रस्टने प्रयत्न करावेत.
महंत स्वामी सागरानंद सरस्वती महाराज म्हणाले, शनिदेवाला विश्‍व मानते. बानकर भाऊंना महापुरुष म्हटले तर वावगे ठरू नये. संस्थानची झालेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. बानकरभाऊ आजीवन अध्यक्ष राहिले. नाहीतर आपण बघतो की, काही गावांमध्ये दोन वर्षे झाले की सरपंच बदलण्याची तयारी सुरू होते.
जंगले महाराज शास्त्री किर्तनात म्हणाले, स्व. बाबुराव बानकर भाऊ म्हणजे शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी. मुखे अमृताची वाणी देह देवाची कारणी असे होते. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ शनिरत्न हा पुरस्कार देवस्थानच्यावतीने दिला जातो.
प्रास्ताविक देवस्थानचे कोषाध्यक्ष योगेश बानकर यांनी केले. शिवाजी महाराज देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके, अनिल आडसुरे, अशोकराव साळवे, पंचायत समिती सदस्य किशोर जोजार, बाळासाहेब सोनवणे, जनार्धन पटारे, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे, मार्केट कमिटी अध्यक्ष कडूबाळ कर्डिले, विश्‍वासराव गडाख, मुळाचे संचालक दशरथ दरंदले, एकनाथ रौंदळ, राहुरी कारखान्याचे संचालक नामदेव ढोकणे, अनिल पाचपुते, अतुल महाराज आदमने, भानुदास महाराज गायके, रोहिदास महाराज चांदेकर, रामनाथ महाराज भांगे, बाबा महाराज घायाळ,
नानासाहेब रेपाळे, माजी सभापती कारभारी जावळे, भाऊसाहेब लांडे, नंदाताई महाराज गवारे, सविता महाराज दरंदले, वसंतराव डावखर, देवस्थानचे उपाध्यक्ष नानासाहेब बानकर, सरचिटणीस दीपक दरंदले, चिटणीस प्रा. आप्पासाहेब शेटे, विश्‍वस्त आदिनाथ शेटे, शालिनी लांडे, पोलीस पाटील अ‍ॅड. सयाराम बानकर, माजी अध्यक्ष दादासाहेब दरंदले, शिवाजी दरंदले, देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले, व्यवस्थापक संजय बानकर, सर्व अधिकारी, कामगार व नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र गहिले यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

पुरस्काराची काहीच किंमत नसते. परंतु ज्यांच्या नावे पुरस्कार दिला जातो त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्यांनी शनिदेवाशिवाय दुसरा देवच मानला नाही. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळतो.मी भाग्यवान आहे. हिमालय पर्वतापासून संपूर्ण देशामध्ये मी फिरलो. धर्माचे काम केले म्हणूनच आज मला या शनिरत्न पुरस्काराने शनैश्‍वर देवस्थानने सन्मानित केले आहे. त्याचा मी सन्मान राखतो, असे सत्काराला उत्तर देताना बालब्रम्हचारी महाराज म्हणाले.

 

LEAVE A REPLY

*