शनिदेवाला जे मागितले ते मिळाले : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने घेतले शनिदर्शन

0

शनिशिंगणापूर (वार्ताहर)- मी ज्या ज्या वेळी दर्शनासाठी आले त्या त्या वेळी देवाला मनापासून जे जे मागितले ते ते मला देवाने दिले. म्हणून माझी शनिदेवावर श्रद्धा असल्याचे मनोगत हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेली आघाडीची नायिका शिल्पा शेट्टी हिने व्यक्त केले.

काल गुरुवारी श्रावण मासाचे औचित्य साधून शिल्पा शेट्टी हिने शनिदेवाला अभिषेक करुन मुलगा विहान व आई सौ. सुनंदा यांचेसमवेत दर्शन घेतले. श्री शनैश्‍वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने कोषाध्यक्ष योगेश बानकर यांनी शिल्पा शेट्टी यांचा तर सुनंदा शेट्टी यांचा सरचिटणीस दिपक दरंदले यांनी सत्कार केला.

यावेळी शिल्पा शेट्टी म्हणाली, मी माझ्या लग्नाच्या आधीपासून शनिशिंगणापूरला शनिदेवाच्या दर्शनासाठी येते. मी ज्या ज्या वेळी दर्शनासाठी आले त्या त्या वेळी देवाला मनापासून जे जे मागितले ते ते मला देवाने दिले. म्हणून माझी शनिदेवावर श्रद्धा वाढत गेली.

मंदिर परिसरात भाविकांना मिळणार्‍या सुविधा व स्वच्छतेमुळे समाधान मिळत असल्याचे तिने सांगितले. यावेळी देवस्थानचे विश्‍वस्त आदिनाथ शेटे, आप्पासाहेब शेटे, शालिनी लांडे, किर्ती बंग, उपकार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले, पत्रकार शांतादेवी चव्हाण, अनिल चव्हाण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*