Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

#MeToo: उद्या मोदींवरही आरोप होतीलः शक्ती कपूर

Share

मुंबई : ‘बॉलिवूडमधील ‘बॅड बॉय’ अशी ओळख असलेले अभिनेते शक्ती कपूर यांनी ‘मीटू’ मोहीमेवर आपले मत व्यक्त केले आहे. मीटू प्रकरणामध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक तरुणी या ब्लॅकमेल करीत आहेत, कोणी कोणावरही आरोप करीत सुटले असून उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही आरोप होईल’, त्यावेळी काय करणार?, असा सवाल शक्ती कपूर यांनी केला आहे.

‘#MeTooची बरीच प्रकरणं समोर येत आहेत. अशा प्रकरणांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक मुली ब्लॅकमेल करत आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्तीचं नाव जाहीर न करता कोर्टात जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याची बदनामी रोखावी. कलाकार असो, व्यावसायिक असो किंवा नेता असो, कोर्टात आरोप सिद्ध झाल्यावरच त्यांची नावं जाहीर करावी,’ असं शक्ती कपूर या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणत आहेत.

अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या वादानंतर बॉलिवूडमध्ये ‘मीटू’ मोहीम सुरू झाली आहे. बॉलिवूडसह राजकारण, शिक्षण क्षेत्रात मीटू मोहीम सुरू झाल्याने अनेकांची झोप उडाली आहे. या मोहीमेचा सर्वाधिक फटका बॉलिवूडकरांना बसत आहे. महिलांनी केलेल्या आरोपांमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. त्यांचे पूर्ण करिअर संपते. कुटुंबीयसुद्धा त्यांच्याकडे संशयाने पाहू लागतात. नोकरीवरून त्यांना काढले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घातले पाहिजे व यासंदर्भात कायदा करायला हवा.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!