Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

एका पोस्‍टरमुळे किंग खानचा ‘झिरो’ अडचणीत

Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटांमुळे अडचणीत आल्याचं स्पष्ट होत आहे. अवघ्या काही दिवसांनीच प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या ‘झिरो’ या चित्रपटामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आनंद एल.राय दिग्दर्शित या चित्रपटातील दृश्यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्यामुळे तो आणि खुद्द दिग्दर्शकही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

शीख बांधवांचं म्‍हणणं आहे की, ‘चित्रपटाच्‍या पोस्टरमध्‍ये शाहरुख खानने नोटांचा हार घातला असून गळ्‍यात कृपाण घातलेला दिसत आहे. हा फोटो मजेशीरपणे दाखवण्‍यात आल्‍याने शीख बांधव नाराज आहेत.’ सूत्रांच्‍या माहितीनुसार, शीख समुदाय शाहरुख आणि चित्रपट निर्मात्‍यांना नोटीस पाठवण्‍याच्‍या तयारीत आहे. सिरसा यांनी या चित्रपटाचे प्रोमोही तातडीने थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे ज्यामध्ये ही किरपान दिसत आहे.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!