VIDEO : शोमध्ये केलेल्या प्रँकमुळे शाहरुख खान भडकला!

0

शाहरुखचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

यात तो अँकरला चांगलेच सुनावत असल्याचे दिसत आहे.

हा व्हिडीओ दुबई ‘रमीज अंडरग्राऊंड’ नावाच्या एका प्रँक शोमधील आहे. त्यात शाहरुख एका फिमेल होस्टबरोबर चिखलात पडतो. समोर एक मोठा प्राणी त्यांच्यावर हल्ला करताना दिसतो.

हल्ला केलेला प्राणी पाहून शाहरुख घाबरतो आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू लागतो. त्याचवेळी शाहरुखला हा प्रँक समजतो.
प्राण्याच्या पोषाखातील एक व्यक्ती बाहेर निघतो, तोच शोचा अँकर असतो. पण शाहरुखला जेव्हा हे समजते तेव्हा तो भडकतो आणि त्याचे नियंत्रण सुटते.
शाहरुख अँकरला रागवायला लागतो आणि लगेचच त्याच्या टीमला बोलावून बाहेर काढण्यास सांगतो. शाहरुख असा रागावेल याची शोमधील कोणालाही कल्पना नव्हती.

 

LEAVE A REPLY

*