Don 3 : शाहरुख नाही तर हा अभिनेता असणार नवा डॉन?

0
मुंबई : शाहरुख खानचा झिरो सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला त्यानंतर शाहरुख आपल्या सिनेमांना घेऊन खूपच सिलेक्टिव्ह झाला आहे. राकेश शर्मांच्या बायोपिकमधून त्यांने हात काढून घेतला. आता अशी माहिती मिळतेय की, शाहरुख खान ‘डॉन3’ मधून बाहेर झाला आहे. निर्माते शाहरुखच्या जागी रणवीर सिंगला घेण्याचा विचार करतायेत.

मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुखने काही वैयक्तिक कारणांमुळे डॉन 3 सोडून दिला आहे. त्यामुळे जोया अख्तर सध्या या सिनेमासाठी दुसऱ्या अभिनेत्याच्या शोधात आहे. जोया अख्तर या सिनेमासाठी रणवीर सिंगच्या नावाचा विचार करतेय. दोघांमध्ये या संदर्भात बोलणं देखील सुरु आहे. रणवीर सिंगने जोया अख्तरच्या दिग्दर्शनाखाली दोनदा काम केले आहे. तर अभिनेत्रीच्या नावासाठी कॅटरिना कैफचा विचार करतेय. कॅटने जोयासोबत ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मध्ये काम केले आहे.

सूत्रांनुसार शाहरुखने ‘डॉन ३’ चित्रपटासाठी ‘सारे जहासे अच्छा’ चित्रपटाला नकार दिला असल्याचे म्हटले जात होता. सध्या शाहरुखकडे कोणते चित्रपट आहेत याचा खुलासा त्याने केलेला नाही.

LEAVE A REPLY

*