युजर्सनी शाहरुख खानच्या ‘झिरो’ म्हटले फ्लॉप, सोशलवर उडवली खिल्ली

0

मुंबई : शाहरुख खान म्हटलं की फक्त त्याच्या नावावरच चित्रपटाची तिकीटं विकली जातील असा समज आहे. असं व्हायचंही पण आताचा काळ मात्र वेगळा आहे. शाहरुखसारखा सुपरस्टार असूनही काही उपयोग नाही हे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ या चित्रपटावरून सिद्ध झाले आहे.

शाहरुख, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ अशी मोठमोठी नावं या चित्रपटाशी जोडली गेली. परंतु, प्रेक्षकांचं मनोरंजन मात्र झालं नाही. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांचा जो काही हिरमोड झाला तो नंतर सोशल मीडियावर उपहासात्मक मीम्सच्या माध्यमातून झळकला.

सोशल मीडियावरही ‘झिरो’ची जोरदार चर्चा आहे. अर्थात ही चर्चा रंगतेय ती ‘झिरो’वरच्या व्हायरल होत असलेल्या भन्नाट मीम्समुळे. होय, सोशल मीडियावर ‘झिरो’वरचे अनेक जोक्स व मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहिल्यानंतर तुम्हालाही युजर्सच्या किएटीव्हीला दाद द्यावीशी वाटेलचं.

LEAVE A REPLY

*