Type to search

जळगाव

शहापूर वाघोळा प्रकल्प ओव्हर फ्लो

Share

शहापूर ता. जामनेर –

येथील खडकी नदीवरील वाघोळा प्रकल्प पूर्ण भरून वाहू लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या प्रकल्पातून शहापूरसह शेळगाव, टाकरखेडा, शेंगोळे गावांच्या पाणीपुरवठा योजना सुरू आहे.

याच खडकी नदीवर तोंडापूर येथे मध्यम प्रकल्प असून तोंडापुर डोंगर परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तोंडापुर धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहत असल्याने त्याचा फायदा वाघोळा प्रकल्पला झाला आहे.

गेल्या वर्षी तोंडापुर मध्यम प्रकल्प भरला नसल्याने खडकी नदीला पुर आला नव्हता. त्यामुळे या परिसरातील शेती उत्पन्नात घट आली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!