पोलिसांतर्फे वेगवेगळे गुन्हे दाखल

0
शहादा । ता.प्र. – नगरसेवक सद्दाम तेली हत्येनंतर शहरात उसळलेल्या दंगलीत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर यांच्या फिर्यादिवरुन संशयित व त्यांच्या नातेवाईकांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, जाळपोळ करणे, लूटमार करणे, पोलिसांवर हल्ला चढवून शासकीय वाहनांवर पेट्रोल फेकणे, पोलिस अधिकार्‍यांना जायबंदी करुन जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न करने आदी कलमान्वये 42 मुख्य आरोपींसह 300 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
नगरसेवक सद्दाम तेली यांच्या हत्येनंतर शहरात दंगल उसळली होती. या दंगलीत जाळपोळ व लूटमारसारखे प्रकार घडले. त्यात अनेक घरे व दुकाने जाळण्यात येवून पोलीसांनाही लक्ष्य करण्यात आले होते.

पोलिसांनी शांततेचे आवाहन करुनही हिंसाचार घडविण्यात आली. याबाबत पोलिस उपनिरीक्षक बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, गरीब नवाज कॉलनीत मुख्तार शेख, समीर मेकॅनिक, फरीद पठाण, मेहमूद शेख, रफीक शेख यांच्या दुकानात बेकायदेशीरपणे प्रवेश करुन संशयित आरोपींना व त्यांच्या नातेवाइकांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

मुख्तार शेख यांच्या पत्नीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घरातील काही वस्तु चोरून नेल्या व पेट्रोल बॉम्ब फेकून त्यांचे घर जाळून टाकले.

मेहमूद शेख, सलीम शेख यांच्या घरातील वस्तु चोरून नेवून त्यांची घरेही जाळण्यात. शेख यांची टवेरा गाडी, दोन ट्रॅक्टर जाळण्यात आले.

प्रक्षोभक जमावाला शांत राहण्याचे आवाहन करूनही जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. पोलिस अधिकार्‍यांसह काही पोलिसांनाही जखमी करुन दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या शासकीय वाहनांचे नुकसान करुन शासकीय मालमत्तेचे नुकसान केले.

म्हणून मोहम्मद (मज्जुचा भाऊ) , कासिद बेकरिवाला आदी 42 मुख्य आरोपींसह 300 जणांविरोधत जाळपोळ, लूटमार, हिंसाचार करणे, पोलिसांवर दहशत पसरविणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांना दुखापत करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, संशयित आरोपी व त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे आदी गुन्हाखाली भांदवि कलम 307, 353, 332, 333, 395, 436 सार्वजानिक संपत्ती हानी प्रतिबंधक कायदा 1984 चे कलम 3,4 आदि कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत.

पाच जणांना अटक
दरम्यान या घटनेप्रकरणी पोलिसांनी मोईन सलिम बेलदार, शे. आसिफ शे. हुसेन, मोहसिन शेख मेहतर, रहीम गनी बेलदार, सलीम मुश्ताक खाटिक या पाच आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयित प्रेम उर्फ साजीद अहमद यास पोलीसांनी सुरत येथून अटक केली आहे.

पोलीसांकडून गँगमन फायर
लूटमार, जाळपोळ व हिंसाचार माजविणार्‍या प्रक्षोभक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांकडून गँगमन फायर करण्यात आले. यात चार हॅण्ड ग्रेनेड, 10 गॅससेल, चार स्टन सेल, चार सीएस सेल एक याप्रमाणे फायर करण्यात आले.

 

 

LEAVE A REPLY

*