पोलीस कारवाई सुरु होताच लुटलेला माल सार्वजनिक जागेवर परत आला !

0
शहादा। ता.प्र-टँकरवरून पाणी भरण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या धुमश्चक्रीनंतर बांधकाम सभापती सद्दाम तेली हत्येप्रकरणातून गरीब नवाज वसाहतीत झालेल्या लुटमारीतील वस्तु पोलीसांकडून जप्त केल्या जात आहेत तर पोलीसांचा कायद्याचा बडगा पाहून चोरटयांनी लुटलेला सामान सदर वसाहतीमधील सार्वजनिक चौकामध्ये सोडून जात आहे.
नगरसेवक सद्दाम तेली यांच्या हत्येनंतर शहरातील गरीब नवाज भागात समर्थकांनी व काही समाजकंटकांकडून जाळपोळ लुटमार करून दशहतीचे वतावरण पसरविले गेले होते.
तेली यांच्या हत्ये प्रकरणातील संशयीतावरील राग व्यक्त करीत या समाजकंटकांनी या संशयीतांसह त्यांचे नातेवाईक व काही समर्थक घरांची सामानाची लुटमार करून जाळपोळ करण्यात आली.

जाळपोळीनंतर काही घरांच्या केवळ सांगडाच शिल्लक राहिला आहे. पोलीस प्रशासनाकडून लुटमार व जाळपोळ करणार्‍यांविरोधात वेगवेगळया कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील उक फिर्यादी जाळपोळीत घर उध्वस्त झालेले अपक्ष नगरसेवक रियाज कुरेशी यांचे आहे.

समाजकंटकांनी केलेल्या लुटमारीबाबत सर्वस्तारातून रोष व्यक्त होत आहे. दुसरीकडे पोलीस प्रशासनाने या समाजकंटकांविरोधात कारवाइचा बडगा उगाराला असून धरपकड सुत्र सुरू केली आहे.

कायद्याच्या भितीपोटी लुटमार करणार्‍यांनी लुटलेल्या संसारोउपयोगी वस्तू कपाट, फ्रिज, वॉशिंग मशिन, टी.व्ही., शिलाई मशिन, सोफासेट यासह किंमती वस्तू गरीब नवाज कॉलनीतील मोकळया जागेत रात्रीचा अंधाराचा फायदा घेत पुन्हा आणून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे.

पोलीसांनी सर्व सामान जप्त करत पोलीसठाण्याच्या आवारात आणला आहे. अजूनही कार्यवाहीच्या भितीपोटी लुटमार करण्याकडून या वस्तु गुपचूपपणे त्या जागेवर सोडून दिल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विविध गुन्हे दाखल
जाळपोळ, लुटमार व दहशतीचे वातावरण पसरविणे, संशयीत आरोपीच्या घरावर हल्ला चढवित लुटमार करणे, त्यांच्यासह पोलीसांवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न, जीवेठार मारण्याचा प्रयत्न आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे आदी कलमान्वये दाखल गुन्ह्यातील सात आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनविण्यात आली आहे.

दरम्यान, दंगल पसरविणार्‍यांचे धरपकड सत्र पोलीसांनी सुरू केले असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. पालिकेतील एमआयएम पक्षाचे नगरसेवक सद्दाम सलिम तेली यांच्या हत्येनंतर त्यांचे समर्थक व समाज कंटकांनी केलेल्या दंगलीत जाळपोळ, लुटमार आदी प्रकार घडले. जमावास शांत करण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलीसांवर दगडफेक करीत जीवेठार मारण्याचा प्रयत्न करणे, संशयीत आरोपींना जीवेठार मारण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या घरातील सामानाची लुटमार करीत घरे जाळपोळ करणे, पोलीस अधिकारी कर्मचार्‍यांना जायबंदी करणे व दहशतीचे वातावरण पसरविणे, त्यांच्या शासकीय वाहनांची मोडतोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे आदी गुन्हे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आले आहेत.

यात 42 मुख्य आरोपीसह 400 जणांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. यातील आरोपींची धरपकड सुरू असून आज पहाटे पाचच्या सुमारास अकबर शहा वजीर शहा (54), मुख्तार सैय्यद नौयादर (22) या मिरानगर या दोघा आरोपींना अटक केली.

काल दि.16 रोजी मोहसिन रफीक मेहतर शे आसिफ शे हुसेन, अय्याज मुस्ताक खाटीक, मोईन सलिम बेलदार व रहीम गनी बेलदार या पाच आरोपींना अटक केली होती.

या सर्व सर्वच सात आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर उभे केले असता त्यांना सहा दिवस पोलीस कोठडी देयात आली आहे.

दरम्यान पोलीसांनी दंगलीप्रकरणी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. यातील आरोपीची धरपकड सुरू झाल्याने अनेक संशयीतांनी गावातून पलायन केले आहे.

LEAVE A REPLY

*