Type to search

maharashtra नंदुरबार राजकीय

जनतेची दिशाभूल करणार्‍या सरकारला हद्दपार करा

Share
शहादा । ता.प्र.- आगामी लोकसभा निवडणुकीत नंदुरबार लोकसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार सर्वच नेत्यांनी शहादा येथे झालेल्या काँग्रेस मेळाव्यात व्यक्त केला. मेळाव्यात नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे दर्शनही घडले. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांवर टीका करताना शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेची दिशाभूल करणार्‍या या सरकारला हद्दपार करण्याचे आवाहनही मेळाव्यात करण्यात आले.

नंदुरबार जिल्हा काँग्रेस मेळावा शहादा खरेदी विक्री संघाच्या आवारात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माजी खा.माणिकराव गावित होते. यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक पाटील, माजी खासदार बापू चौरे, आ.अ‍ॅड.के.सी.पाडवी, माजी आ.पदमाकर वळवी, आ.काशिराम पावरा, आ.डी.एस.अहिरे, काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रकाश सोनवणे, जिल्हा प्रभारी योगेश पाटील, जि.प.अध्यक्षा सौ.रजनी नाईक, उपाध्यक्ष सुहास नाईक, धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्याम सनेर, शिरीष नाईक, भरत गावित, रामचंद्र पाटील, रमेश गावित, दत्तू चौरे, आत्माराम बागले, रतन पाडवी, कुणाला वसावे, संजय माळी, सी.के.पाडवी, विक्रम पाडवी, रोहिदास पाडवी, प्रा.संजय जाधव, उपनराध्यक्षा रेखा चधरी, गौतम जैन, जि.प सदस्या संगिता पाटील , राजाराम पाटील, जगदीश पाटील, सुनील सखाराम पाटील, प्रेमसिंग आहेर, रवींद्र रावल, नवापूर नगराध्यक्ष हेमलता पाटील, सभापती रंजना नाईक, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शमीमबी कुरेशी, कंचनबेन पाटील, शांताबाई पवार, दीपक पटेल, विक्रम पाडवी आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कार्याध्यक्ष दिपक पाटील. यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना राज्य सरचिटणीस प्रकाश सोनवणे म्हणाले की, राज्य व देशात आज वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. जनता हवालदिल झाली आहे. सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे आहे. यातून सावरायचे असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही. सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारने खोटे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. देशाला विकासाची दिशा देण्यासाठी आणि या नौटंकी सरकारला घालविण्यासाठी काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.

श्याम सनेर म्हणाले, जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजपाचे नेते करीत आहेत. शेतकरी-कष्टकरी, जनतेच्यया विकासासाठी सरकारकडे पैसे नाहीत. मात्र घोडेबाजारसाठी निधी आहे. पर्यटनाच्या नावाने त्याच निधीवर डल्ला मारून तापी काठी स्वतःचा विकास करून सरकारलाच लुठण्याचे काम हे नेते करीत आहेत. पिकविमा कर्ज, गॅस अनुदान आदी योजनांच्या नावाने जनतेचा खिसा खाली करणार्‍या या सरकारला हद्दपार करण्याचे आवाहनही त्यांनी केले. माजी खा.माणिकराव गावित म्हणाले, मोदी लाटेमुळे माझा पराभव झाला असला तरी जिल्हावर आजही काँग्रेसचा प्रभाव आहे. त्यामुळे दिशाभूल करणार्‍याना घरी पाठवा व पुन्हा लोकसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचे आवाहन त्यांनी केले. आ.डी.एस.अहिरे, बापू चौरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष किशोर मोरे यांनी केले.

ठळक वैशिष्टये
*काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी दीपक पाटील यांची निवड झाल्याने सर्व मान्यवरांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
* आजच्या मेळाव्याला काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराची सुरुवात नंदुरबार जिल्हयातून करावी व गांधी परिवाराचे जिल्हयाशी असलेले नाते कायम ठेवावे असा आशयाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
* पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंशी देवेंद्र फडणवीस हे थापाडे असून जनतेची दिशाभूल करीत असल्याने त्यांना आता घरी बसविण्यासाठी सर्व कार्यकत्यांनी एक दिलाने कामे करण्याची गरज असल्याचे मत सर्वच नेत्यांनी मांडले.
* आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फ इच्छूक असलेले उमेदवार आ.अ‍ॅड.के. सी. पाडवी, माजीमंत्री अँड. पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत, आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक हे सर्व नेते पहिल्यांदाच एका व्यासपीठावर.
* आमच्यात उमेदवारीबाबत अंतर्गत गटबाजी नाही, पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्यासाठीचे काम करण्याची ग्वाही सर्व नेत्यांनी हजारों कार्यकार्यासमोर दिल्याने कार्यकर्त्यांनीही टाळ्या वाजवून स्वागत केले.
* केद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व पर्यटनमंत्री जयकुमार रावल मनमाड़ इंदोर रेल्वेबाबत नागरिकांची दिशाभूल करीत असून ज्यात हिम्मत असेल तर त्यांनी 16 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करुन दाखवावे, असे आव्हान काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी दिले.
* सुलवाडेे, जामफळ, प्रकाशा-बुराई योजनेसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणतात की, आम्ही 400 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. हा निधी मंत्री महोदयांनी दाखवला तर मी राजकारणातून सन्यास घेईल, अन्यथा त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा असे आव्हान श्री.सनेर यांनी केले.

नंदुरबार जिल्हा काँग्रेेसमय आहे.देशाला विकासाची दिशा देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. शेतकरी-कष्टकर्‍यांना उभे करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. काँग्रेसचे कायदे देश व जनतेच्या हिताचे होते. ते मोडकळीस आणण्याचे काम मोदी व फडणवीस सरकार करीत आहे. जनधन योजनेतही भाजप सरकारगोरगरीबांची लूट करीत आहे. जातपडताळणीचा कायदा रद्द करून दलित-आदिवासींच्या हक्कांवर गदा आणणार्‍या या सरकारचा त्यांनी निषेध केला.
– अ‍ॅड.पद्माकर वळवी,
माजीमंत्री

उपसा सिंचन योजना पूर्ण होणे आवश्यक होते. रहाट्यावड धरणालाही अडचणी आणल्या जात आहेत. विकासाच्या नावावर दिशाभूल केली जात आहे. किसान सन्मान योजनेच्या नावावर शेतकर्‍यांना प्रतिदिन रुपये 16.43 (वार्षिक 6 हजार) देऊन कुठला सन्मान करीत आहेत. शेतकर्‍यांची एकप्रकारे क्रूर थट्टाच सरकार करीत आहे. मुद्रा लोनच्या नावाने तरुणांची फसवणूक होत आहे. त्यांच्या नादी लागून स्वतःचे व देशाचे भवितव्य उध्वस्त करू नका, असे सांगून आ.पाडवी पुढे म्हणाले,1995 च्या निवडणुकीनंतर डॉ. गाविताना राज्यमंत्री करण्याचे पाप मी केले असून त्याच गावितांवर 6 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराची केस आजही न्यायालयात प्रलंबीत आहे.
-आ.अ‍ॅड.के.सी.पाडवी
धडगाव-अक्कलकुवा मतदार संघ

शेतकरी व सहकारविरोधी असणार्‍या या सरकारने सहकार मोडकळीस आणण्याचे काम केले आहे. शेतकर्‍यांचे सातबारे आजही कोरे नाहीत. रायरंगी सोंग घेणारा पीएम वैयक्तिक टीका करण्यात व्यस्त आहे. काँग्रेसला कोणीही हरवू शकत नाही. आपणच आपल्याला हरवतो. त्यामुळे आपले घर आपणच सांभाळताना युवकांना जवळ केले पाहिजे. कारण निवडणुकीचा कौल तरुणाई ठरवीत असते. ज्यांना आपले महत्व नाही त्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहनही त्यानी केले.
– दीपक पाटील
जिल्हा कार्याध्यक्ष

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!