Type to search

नंदुरबार

शहाद्यात रस्त्याच्या धुळीमुळे पुन्हा अपघात

Share

शहादा । ता.प्र.- शहरालगत स्वामी विवेकानंद बसथांब्यासमोर धुळीमुळे जीप चालकाचा रस्ता न दिसल्याने पुन्हा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जिवीताहानी झाली नाही.

कोळदा ते खेतीया दरम्यान रस्त रूंदीकरणाचे काम टप्याटप्याने सुरू आहे. बरेचसे काम पूर्णत्वाला आले आहे. परंतु शहादा ते प्रकाशा हा रस्ता प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. दुचाकी वाहनधारकांना र जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. या रस्त्यावर बर्‍याच ठिकाणी मातीकाम सुरू असल्याने उडणार्‍या धुळीमुळे समोरच वाहन किंवा रस्ता दिसत नाही. शुक्रवारी दुपारी शहादा शहराबाहेर असलेल्या स्वामी विवेकानंद बसस्थांजवळ श्री साईबाबा मंदिरासमोर जीप (क्र.एमएच39- सी 3332) चालकाला धुळीमुळे रस्ता दिसली नाही. त्यामुळे जीप दुभाजकावर चून उलटली. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने जीवीताहानी झाली नाही. या रस्त्यावर अपघात होत असून मातीकाम सुरू असलेल्या पाणी शिंपडण्याची वारंवार मागणी होत असतात. संबंधित विभाग व ठेकेदराचे दुर्लक्ष होत असल्याने अपघात होत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!