Type to search

नंदुरबार फिचर्स

बिबट्यासह कुत्रा सात तास कोरड्या विहिरीत एकत्र

Share

शहादा 

तालुक्यातील वर्ढे टेंभे येथे आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास कुत्र्याचा पाठलाग करत असतांना सुमारे अडीच ते तीन वर्षाचा बिबट्या तीस फुटापेक्षा अधिक खोल असलेल्या कोरड्या विहिरीत पडला. सोबत कुत्राही विहिरीत पडला. त्यानंतर विहिरीत काही काळ दोघांचा संघर्षही झाला. शेवटी आपलाच जीव धोक्यात असल्याचे लक्षात आल्यामुळे दोघेही दोन कोपर्‍यांना शांत जाऊन बसले. अखेरी सात तासांनंतर दोघांनी जिवंत बाहेर काढण्यात आले.

तालुक्यातील अनेक शेतशिवारामध्ये बिबट्यांचा मुक्त संचार वाढला आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुर यांच्यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. आज सकाळी वर्ढे टेभे येथे अशीच घटना ग्रामस्थांना अनुभवास मिळाली. सकाळी पाच वाजेचा सुमारास अन्नाच्या शोधार्थ भरकटलेला बिबट्या आदिवासी वसाहतीतून कुत्र्यांंची शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग करीत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.

कुत्र्यांचा पाठलाग करताना गावालगत असलेल्या वसाहतीतील तीस फुटापेक्षा अधिक खोल असलेल्या गाव विहिरीत बिबटया पडला. कुत्राही त्याच विहिरीत पडला. विहिरीला कठडे नसल्याने दोघेही एकाच विहिरीत पडले. कुत्रा आणि बिबट्या यांचा विहिरीतच संघर्ष सुरू होता.

हा थरार पाहण्यासाठी ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली. घटनेची माहिती सरपंच चंद्रकांत पाटील, पं.स.सदस्य शिवाजी पाटील यांनी वनविभागाचे वनक्षेत्रपाल अनिल पवार यांना माहिती कळविण्यात आली. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, उपवनसंरक्षक एस.बी.केवटे व तहसिलदार मिलिंद कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देत आवश्यक सुचना केल्या. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाने पिंजरा विहिरीत उतरविला होता. त्या दरम्यान ग्रामस्थांची गर्दी वाढत असल्याने पोलिसांना पाचारण करीत गर्दीला हटविण्यात आले. अथक परिश्रमानंतर अखेर त्या बिबट्याला पिंजर्‍यात जेरबंद करीत सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. हा बिबट्या तीन वर्ष वयोगटातील असल्याचे वनक्षेत्रपाल अनिल पवार यानी सांगितले.

ही मोहीम वनविभागाचे प्रविण वाघ, एस.एस.देसले, संतोष राठोड, एस.जी.मुखांडे, एस.डी.इदवे, के.एम.पावरा, जी.आर.वसावे, आर.झेड.पावरा, नईम मिर्झा, आर.ए.ठाकरे, आबा न्याहाळदे यांनी फत्ते केली. काही वेळानंतर ग्रामस्थांच्या मदतीने कुत्र्यालाही बाहेर काढण्यात आले. बिबट्याला वनविभागाच्या वाहनातून वनविभागाचा कार्यालयात नेण्यात आले होते.

संकटात प्राणी हल्ला करत नाही

सकाळी 5 वाजेताआदिवासी वसाहतीतून एक कुत्रा जोरात पळत असतांना ग्रामस्थांनी पाहिला. त्या पाठोपाठ बिबट्याही पळतांना दिसला. पळतापळता दोघेही गावातील विहिरीत पडले. त्या विहिरीत सुरुवातीला बिबट्या व कुत्र्यामधील संघर्ष गावकर्‍यांनी पाहिला. अखेर बिबट्याने माघार घेत तोंडात आलेली शिकार सोडून विहिरीच्या एका कोपर्‍यात तर कुत्रा दुसर्‍या कोपर्‍यात जाऊन बसून राहिले. या घटनेत कुत्र्याचा जिव वाचल्याने तो नशीबवान ठरला. पशू वैद्यकीय तज्ज्ञांनुसार, प्राणी जेव्हा संकटात असताना तेव्हा एकमेकांवर हल्ला करीत नाही. तोच प्रकार कुत्रा आणि बिबट्याने केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!