नगरसेवकाचा संसार उभा करण्यासाठी नगराध्यक्ष सरसावले

0
शहादा । ता.प्र. – दंगलीत समाजकंटकांनी लूटमार करित अपक्ष नगरसेवक रियाज कुरेशी यांचे घर जाळून टाकल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
त्यांना आधार देत त्यांचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील पुढे सरसावले असून भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र जमदाळे यांचीही साथ लाभली आहे.
अपक्ष नगरसेवक रियाज कुरेशी यांनी भाजपाला पालिकेत पाठिंबा दिल्याने त्याचा राग ठेवून दंगलीत समाजकंटक व एमआयएम कार्यकर्त्यांनी गरीब नवाज कॉलनीतील त्यांच्या घरातील सामानाची लूट करीत घर जाळून टाकले.

या घटनेत त्यांचा परिवार बालंबाल बचावला. मात्र संसाराची राखरांगोळी झाली. कुरेशी यांना धीर देण्यासाठी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जितेंद्र जमदाळे, नगरसेवक प्रशांत निकुंभ, अरविंद कुवर, अतुल जयसवाल, विनोद जैन, हितेंद्र वर्मा, दिनेश खंडेलवाल, धनराज ईशी, निलेश मराठे आदी पदाधिकारी गेले.

कुरेशी यांच्या जळीत घराची व संसाराची झालेली राख रांगोळी पाहून सर्वच जण अवाक् झाले आणि कुरेशी यांचा संसार व घर पुन्हा उभे करण्यासाठी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील पुढे सरसावले.

त्यांना भाजपा पदाधिकार्‍यांची साथ मिळाली असून संसार उभा करण्यासाठी प्रत्यक्ष सुरुवात करीत माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे.

 

LEAVE A REPLY

*