वंडर किड्समध्ये शाडू मूर्ती कार्यशाळा

0

नाशिक । म्हसरूळ येथील वंडर किड्स प्ले स्कूल अ‍ॅड निर्सरी येथे शाडू माती पासून गणपती बनवण्याची कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेत विद्यार्थ्यासह पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व कळावे, मूर्ती कलेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली गेली होती.

प्लास्टर ऑफ पॅरिस पासून साकारलेल्या मूर्तीचे लवकर विघटन होत नाही. त्यामुळे जल प्रदूषण व अस्वछता होते. याशिवाय शाडू मातीच्या गणेशमूर्ती 10 मिनिटात पाण्यात विरघळतात. यामुळे जल प्रदूषण टाळले जाते.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांनी तयार केलेली एक आकर्षक व सुंदर मूर्ती घरात गणेशोत्सवात स्थापन करावी असे मार्गदर्शन शाळेची मुख्याध्यापक उर्मी झालावत यांनी केले. कविता सोनावणे, वैशाली शेवाळे, मोनाली पटेल, अनुराधा देवरे यांच्या उपस्थितानी गणेश मूर्ती बनवल्या. प्रसंगी इशरे संस्थेचे अध्यक्ष राउफ शेख, उपाध्यक्ष वैभव जोशी, सचिव केशव अष्टेकर, पराग झालावत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*