Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

शबरीमला : तृप्ती देसाई दर्शनासाठी जाणार

Share

केरळ : शबरीमलाच्या मंदिरात स्त्रीयांच्या प्रवेशावरचे निर्बंध सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबरमध्ये उठवल्यानंतरदेखील एकाही महिलेला अयप्पा स्वामींचे मंदिरात जाऊन दर्शन घेता आलेले नाही. आता या प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाईंनी उडी घेतली असून १७ नोव्हेंबरला त्या शबरीमलाच्या मंदिरात प्रवेश करणार आहेत.

शनिशिंगणापूरच्या मंदिरात,कोल्हापूरच्या मंदिरात आणि हाजी अलीच्या दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश मिळण्यासाठी मोहीम उभी करणाऱ्या तृप्ती देसाई आता शबरीमलाच्या मंदिरात आपल्या सात महिला सहकाऱ्यांसह प्रवेश करणार आहेत.

देसाई १७ नोव्हेंबरला मंदिरात शांततामय मार्गाने मंदिरात प्रवेश करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आणि महिलांना प्रवेशाचा अधिकार मिळावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत’ असं मत तृप्ती देसाईंनी मांडलं आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!