'शब्दगंध' जीवन गाणे गातच राहावे : काव्यकट्टा

'शब्दगंध' जीवन गाणे गातच राहावे : काव्यकट्टा

जीवन त्यांना कळले हो..

मीपण ज्यांचे पक्व फळापरीसहजपणाने गळले होजीवन त्यांना कळले हो...

जळापरी मन निर्मळ ज्यांचे,गेले तेथे मिळले होचराचरांचे होउनि जीवनस्नेहासम पाजळले होजीवन त्यांना कळले हो...

सिंधूसम हृदयांत जयांच्यारस सगळे आकळले होआपत्काली अन् दीनांवरघन होउनि जे वळले होजीवन त्यांना कळले हो...

दूरित जयांच्या दर्शनमात्रेमोहित होऊन जळले होपुण्य जयांच्या उजवाडानेफुलले अन्य परिमळले होजीवन त्यांना कळले हो...

आत्मदळाने नक्षत्रांचे वैभवज्यांनी तुळिले होसायासाविण ब्रह्म सनातनउरींच ज्या आढळले होजीवन त्यांना कळले हो...

- बा. भ. बोरकरप्रा.राजेश्वर पांडुरंग शेळके

करोनाकाळात मदतीचे हजारो हात पुढे येत आहेत. कळत-नकळत अनेकांचा आधार बनत आहेत. आपुलकीचा हा झरा असाच झुळझुळत राहणार आहे. माणसाला भौतिक सुखांचा अहंकार झाला होता. पण कोणतीही भौतिक गोष्ट शाश्वत नाही हे माणसाला आता उमगले आहे. कदाचित त्यामुळेच माणसे आपल्याबरोबर इतरांचेही जीवन सुखी व्हावे यासाठी धडपडत आहेत. त्यांना जीवनाचा खरा अर्थ समजला आहे.

ऐकायला हवे तू...

आभाळ वेदनांचे पेलायला हवे तू आता तरी मनाचे ऐकायला हवे तू

जोवर समोर काही पर्याय येत नाही हे दुःखही धीराने सोसायला हवे तू

वैरी बनून आला हा काळ क्रूर दारीआहे तिथेच त्याला रोखायला हवे तू

जितका प्रहार मोठा होईल काळजावर तितक्याच ताकदीने झुंजायला हवे तू

(दुःखा तुझी कधी मी केली कुठे निराशा? उपकार थोर माझे मानायला हवे तू! )

अद्याप ही लढाई झाली समाप्त नाही हिंमत नकोस हारू...जिंकायला हवे तू!

जाईल रात्र काळी, होईल लख्ख सारे पण तांबडे फुटेतो, थांबायला हवे तू !

- प्रा.राजेश्वर पांडुरंग शेळके

करोनाचा संसर्ग वाढतच आहे. हा काळ कोणाही माणसाने अस्वस्थ व्हावे असा खराच! पण प्रत्येक रात्रीनंतर नव्या दिवसाचे तांबडे फुटत असते. कितीही संकटे आली तरी माणसाने त्याची हिंमत हरायची नसते. आव्हानांचा सर्व सामर्थ्यानिशी सामना करायचा असतो. कारण काळोखानंतर उष:काल होणारच असतो.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com