राहाता तालुक्यात 36 रुग्ण

राहाता तालुक्यात 36 रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) नव्याने 36 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून 46 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता 149 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात (Rahata taluka) आतापर्यंत 23024 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 21896 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

जिल्हा रुग्णालयात-00 खासगी रुग्णालयात 21 तर अँटीजेन चाचणीत 15 असे एकूण 36 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यातील अस्तगाव-04, राजुरी-01, ममदापूर-02, लोणी बुदुक-06, नांदुर्खी-05 कोर्‍हाळे-02, साकुरी-01, भगवतीपूर-01, बाभळेश्वर बुद्रुक-01, वाकडी-01, पुणतांबा-01, रामपूरवाडी-01 असे ग्रामीण 26 तर शहरी शिर्डी-04, राहाता-02 अन्य 04 असे सर्व एकूण 36 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com