Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

लष्करी अधिकार्‍याकडून प्रशिक्षणार्थी जवानाचे लैंगिक शोषण

Share

नाशिकरोड । प्रतिनिधी

येथील आर्टिलरी सेंटरमध्ये लष्करात सुभेदार असलेल्या अधिकार्‍याने एका प्रशिक्षणार्थी जवानाचे दोन वेळा लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी पीडित जवानाने उपनगर पोलीसांत तक्रार दाखल केली. पोलीसांनी संबंधित अधिकार्‍याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे राहणारा 19 वर्षीय युवक आर्टिलरी सेंटरमध्ये दि. 22.4.2019 पासून प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहे. या दरम्यान पाच ते सहा प्रशिक्षणार्थी जवानांना जेसीओकडे सेवक म्हणून नेमणूक केली जाते. यापैकी पीडित प्रशिक्षणार्थीकडे जेसीओ सुभेदार महेश पांडे यांचेकडे सेवक म्हणून नेमणूक केली होती. वरीष्ठांच्या आदेशानुसार पीडित जवान हा पांडे यांच्या निवासस्थानी गेला असता पांडे हे झोपले होते.

त्यानंतर त्यांनी माझे पाय दुखत असून आपली मालीश करण्यास सांगितले. या आदेशानुसार जवानाने त्यांची मालीश करण्यास सुरुवात केली असता पांडे यांनी जवानाशी अश्लिल चाळे करत जबरदस्तीने अत्याचार केला. यावेळी जवानाने विरोध केला असता त्याला ड्युटी माफ करून परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे सांगितले. याबाबत बाहेर वाच्यता केल्यास प्रशिक्षण कालावधी वाढवून देईल, असा दम दिला. त्यानंतर पुन्हा अशाच प्रकारे संबंधित जवानावर दुसर्‍यांदा अत्याचार केला.

दरम्यान दुसर्‍यांदा असा प्रकार सुरू असताना पीडित जवानाचा सहकारी पांडे यांच्या निवासस्थानी आला. पांडे यांनी घाबरून पीडित जवानास पलंगाखाली लपण्यास सांगितले. सहकारी गेल्यानंतर पांडे यांनी पुन्हा संबंधित जवानाला बाहर वाच्यता न करण्याबाबत दमबाजी केली. या घटनेनंतर पीडित जवानाने सुभेदार मुकेश कुमार यांना झालेला प्रकार कथन केला.

त्यांनी वरीष्ठ बॅटरी कमांडर यांना कळवले. वरीष्ठांनी पीडित जवानाकडून माहिती घेऊन लष्करी रुग्णालयात दाखल केले. या घटने प्रकरणी संबंधित जवानाने पांडे यांच्या विरूद्ध उपनगर पोलीसांत तक्रार दाखल केली असून पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!