अल्पवयीन पत्नीसोबत शारिरीक संबंध म्हणजे अत्याचारच – सर्वोच्च न्यायालय

0
नवी दिल्ली | अल्पवयीन पत्नीसोबतचे शारीरिक संबंध म्हणजे अत्याचारच आहे, असा महत्वाचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने आज  दिला आहे.

यावेळी न्यायालयाने कलम ३७५ मधील अपवादात्मक तरतूददेखील रद्द केली असून निर्णयासोबतच सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठीचे वय कमी केले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यामुळे सज्ञान व्यक्तीसाठी १८ वर्षांची मर्यादा कमी केली जाऊ शकत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

अल्पवयीन मुलीसोबत तिच्या पतीने शारीरिक संबंध ठेवल्यास तिला याबद्दलची तक्रार वर्षभरात दाखल करावी लागेल. त्यानंतर कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, बालविवाहाच्या प्रथेबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली असून सामाजिक न्यायासंबंधीचे कायदे ज्या भावनेने तयार केले जातात त्या भावनेने ते लागू केले जात नसल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

*