1 जुलै पासून लागू होणार सातवा वेतन आयोग

0

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी (दि.२८ रोजी ) रात्री पत्रकार परिषद बोलवून सातव्या वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्त्यासह इतर अनेक भत्ते वाढीव दराने देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने काही अटीसह मंजुरी दिली.

याचा थेट लाभ केंद्र सरकारच्या देशातील 34 लाख कर्मचारी  सैन्य दलांमधील 14 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारच्या या मंजुरीनंतर भत्त्यांचे सुधारित दर 1 जुलैपासून लागू होतील.

शिफारसींना मिळालेली मंजुरी-

नर्सिंग भत्ता 4800 वरून 7200 रुपये

ओव्हर टाइम भत्ता 360 वरून 540 रुपये

पेंशनर्सचा फिक्स मेडिकल भत्ता 500 रुपयावरून 1 हजार रुपयांवर

सियाचिनमध्ये काम करणाऱ्या जवानांच्या भत्त्यांत 14 हजाराने वाढून 30 हजार आणि अधिकाऱ्यांना 21 हजाराने वाढून 42500 करण्यात आले.

अपंगासाठी विशेष पेंशन भत्ता 4500 वरून 6750 रुपये

हॉस्पिटल केअर अलाउंस 2070-2100 ने वाढून 4100-5300 रुपये

 

LEAVE A REPLY

*