शेतकरी संपाचा सातवा दिवस : नाशिक बाजारसमितीमध्ये भाजीपाला आवक

0

नाशिक : शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी शेतकरी संपाचे वेगळे चित्र बघावयास मिळत आहे. आज सकाळपासून शेतकऱ्यांच्या शेतातून अनेक भरेकाऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी यार्डात आणला होता.

कालच्या पेक्षा आज दरही आवाक्यात दिसून आले. जवळपास निम्म्याने भाजीपाल्याचे दर हे कालपेक्षा कमी असल्याने हळूहळू बाजारसमितीमध्ये गर्दी वाढतांना दिसत आहे.

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे गेल्या सात दिवसांपासून बाजारसमित्या ओस पडलेल्या होत्या. नाशिक बाजार समितीचे दररोज दोन ते तीन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झालेली होती. हळूहळू पूर्वपदावर परिस्थिती येत असल्याचे दिसत असून बाजारात आलेली ग्राहकदेखील आता संप मिटायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करू लागले आहेत.

परंतु आज बाजारसमितीत भाज्यांची आवक वाढली त्यामुळे कडाडलेले भाव पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे चित्र दिसत आहे.

नाशिकमधील संपाच्या पार्श्वभूमीवर कालपासून जमावबंदीचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. काल जिल्ह्यातील अनेक तलाठी कार्यालये, ग्रामपंचायत, तहसील आवाराच्या गेटला टाळे ठोकून शेतकरी संपाचा सहावा दिवस पार पडला.

यामुळे सर्वच भागातील शासकीय कार्यालय परिसर, तसेच चौकाचौकात अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*