अखेर 17 शिवशाही नाशकात दाखल; आजपासून नियमित पुणे सेवा सुरू

0
नाशिक । शहरातुन नागपूरला पळवण्यात आलेल्या चार शिवशाही बसेसनंतर शनिवारी तसेच रविवारी नाशिक शहरात पुन्हा नव्याने सतरा ’शिवशाही’ बसेस दाखल झाल्या आहेत. आज पहाटेपासून त्यांची नियमीत पुणे सेवा सुरू झाली. आज पहाटे साडे चार वाजता पहिली शिवशाही ठक्कर बाजार बसस्थानकातून पुण्याच्या दिशेने गेली. यानंतर दर अर्धा तासाने एक बस या प्रमाणे या बस पुण्याला रवाना झाल्या. तसेच पुण्याकडून परतल्या.

नाशिक येथून मोठे प्रकल्प नागपूरला पळविण्याच्या सवयीप्रमाणे नाशिक येथे दाखल झालेल्या 4 शिवशाही बसेस दुसर्‍याच दिवशी नागपूरला पळविण्यात आल्या होत्या.यामुळे नाशिककर प्रवाशांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. शहरात लवकरच मोठया संख्येने शिवशाही दाखल होतील असेे विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी म्हटले होते. त्यानुसार सतरा शिवशाही शहरात टप्याटप्याने नाशिक येथे दाखल झाल्या.

एकटया कोल्हापूर डेपोतून तेरा शिवशाही बसेस आल्या आहेत. तर चार शिवशाही रायगड येथून रात्री उशीरा दाखल झाल्या. दिवाळीच्या आधी शिवशाही शहरात दाखल झाल्याने नाशिक व पुणे शहरातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. 2 ऑक्टोंबर रोजी शहरात दाखल झालेल्या व शिवनेरी बसच्या तुलनेत कमी दर असल्याने शिवशाहीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. याच पार्श्वभूमीवर नव्याने आलेल्या शिवशाहीतून चांगला महसूल मिळेल असा विश्वास एसटी अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

 

 

LEAVE A REPLY

*