बापानेच केले मुलीचे सात वर्षे लैंगिक शोषण

jalgaon-digital
1 Min Read

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – जन्मदात्या बापानेच पोरीचे सात वर्षे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नराधम बापाविरुद्ध्द बलात्कार तसेच बाललैंगिक अत्याचार कायदा कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बारामती येथे उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती येथील एका 20 वर्षीय पीडितेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वयाच्या 13 व्या वर्षापासून पित्याकडून तिच्यावर अत्याचार केला जात होता. फिर्यादीत नमूद केल्यानुसार 13 डिसेंबर 2013 ते 19 मार्च 2020 या कालावधीत राहत्या घरात हे घडत होते. या मुलीला 2013 मध्ये मासिक पाळी सुरू झाली. त्यामुळे तिला त्रास होवू लागला. याचा फायदा घेत तिच्या बापाने तिच्याजवळ जात तुला मासिक पाळीमुळे पोटदुखीचा त्रास होत आहे. त्याच्यावर माझ्याकडे एक उपाय आहे असे म्हणत जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला.

ती वयाने लहान असल्याने आणि बापाला घाबरत असल्याने तिने यासंबंधाची कुठेही वाच्यता केली नाही. त्याचाच गैरफायदा घेत नराधम बापाने सलग सात वर्षे वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याने या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले. तर तुझ्याकडे बघून घेईन अशी धमकी तिला दिली होती.

बापाचा त्रास असह्य होवू लागल्याने पीडित मुलीने आईला व अन्य नातेवाईकांना या प्रकाराबाबत कल्पना देत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. नराधम बापाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *