Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याएमपीएससी परीक्षेसाठी साडेसात हजार विद्यार्थ्यांची दांडी; 'इतक्या' विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

एमपीएससी परीक्षेसाठी साडेसात हजार विद्यार्थ्यांची दांडी; ‘इतक्या’ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

नाशिक | Nashik

आज घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त (पूर्व) परिक्षा 2020 च्या सकाळ सत्राची परीक्षा सकाळी 11 ते 12 या वेळेत संपन्न झाली. यावेळी तब्बल साडेसात हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली…. (MPSC Examination)

- Advertisement -

या परिक्षेसाठी जिल्ह्यातून 22 हजार 419 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील 14 हजार 932 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर असल्याची माहिती, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली आहे.

या परीक्षेत 7 हजार 487 विद्यार्थी गैरहजर होते. जिल्ह्यातील 58 परीक्षा उपकेंद्रावर झालेल्या या परीक्षेसाठी 1 हजार 900 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

सर्व परीक्षा उपकेंद्रावर पोलीस प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, अशीही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या