नाशिकसह सात तालुके रेड झोनमध्ये; उर्वरित जिल्हा आॅरेंज झोन; मद्याची दुकाने उघडणार

jalgaon-digital
3 Min Read

झोन नूसार अटिशर्ती लागू

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेसह देवळाली कन्टोनमेंट क्षेत्र, मालेगाव महानगरपालिका व  उर्वरित मालेगाव तालुका, निफाड, चांदवड, सिन्नर, येवला, नांदगाव तालुक्यांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर उर्वरीत तालुके आॅरेंज झोनमध्ये समाविष्ट आहे. राज्य शासनाने रेड व आॅरेंज झोन बाबत ज्या गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत त्या जिल्ह्याला लागू असून जिल्हा प्रशासनाने त्यात कोणताहि बदल केला नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.

शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे व त्या अधिसूचनेत समाविष्ट असलेल्या प्रतिबंधित व सुट असलेल्या बाबींमध्ये जिल्ह्याच्या स्तरावर कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

स्थानिक जिल्हा प्रशासनास दिलेल्या अधिकारानुसार नाशिक महानगरपालिका, देवळाली कन्टोनमेंट क्षेत्र, मालेगाव महानगरपालिका क्षेत्र उर्वरित मालेगाव, निफाड,  चांदवड,  सिन्नर,येवला, नांदगाव या क्षेत्रांमध्ये गेल्या 21 दिवसात रुग्ण आढळून आलेले असल्याने  त्या क्षेत्रास रेड झोन असे घोषित करण्यात आले आहे.

रेड झोन मधील शासनाकडून निर्गमित झालेल्या अटिशर्ती वरील क्षेत्रास लागू असेल. तर पेठ, सुरगाणा, दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबक, कळवण, देवळा व बागलाण हे तालुके  ऑरेंज झोनमध्ये असणार आहेत.

त्या ठिकाणी मूळ अधिसूचनेत ऑरेंज झोन मध्ये देण्यात आलेली सूट व अटिशर्ती लागू राहतील. त्यामुळे नाशिक जिल्हा रेड की आॅरेंज झोनमध्ये हा संम्रभ दूर झाला आहे.


जिल्ह्यातील नागरिकांनी लॉक डाऊन चा काळात संयम पाळून आठ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण निर्माण होऊ दिला नाही. त्यामुळे हे तालुके ऑरेंज झोन मध्ये समाविष्ट करता आले. उर्वरित तालुक्यांमधील रुग्ण देखील लवकर बरे होऊन रुग्ण संख्या शुन्यावर येईल. रेड व आॅरेंज झोनबाबत शासनाने दिलेल्या गाईडलाईन्स जिल्हयात जशेच्या तश्या लागू केल्या जाणार आहे.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक


 

ऑरेंज झोनमधील व्यवहार : (कंटेनमेंट झोन बाहेर)

• जिल्ह्यातल्या जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरही बस सेवा सुरू ठेवता येणार नाही.

• केश कर्तनालय, स्पा आणि सलून बंद राहतील. काही अटींच्या अधीन राहून खालील बाबींना परवानगी देण्यात येईल…

• एक वाहनचालक व दोन प्रवाशांसह टॅक्सी व कॅब यांना परवानगी देण्यात येईल.आवश्यक ती परवानगी घेऊन जिल्ह्यातल्या जिल्ह्यात व्यक्ती आणि वाहनांना फिरण्यास परवानगी असेल. मात्र त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून किंवा त्यांनी नेमलेल्या प्रतिनिधींकडून पासेस घेणे आवश्यक राहील.

• चारचाकी वाहनांमध्ये वाहनचालकाशिवाय केवळ दोन व्यक्तींनाच प्रवास करण्याची मुभा असेल.


रेड झोन (हॉटस्पॉट्स) मधील उपक्रम (कंटेनमेंट झोन) बाहेरील)
पुढील उपक्रमांना/कृतींना परवानगी दिली जाणार नाही :

• सायकल रिक्षा आणि ऑटो रिक्षा.

• टॅक्सी आणि कॅब एकत्रित करणारे.

• जिल्ह्यार्तंगत व आंतरजिल्हा बस चालविणे.

• केशकर्तनालय, स्पा आणि सलून.

खालील निर्दिष्ट केलेल्या निर्बंधांसह उपक्रम/कृतींना परवानगी दिली जाईल

• केवळ परवानगी असलेल्या कामांसाठी व्यक्ती आणि वाहनांची हालचाल. चारचाकी वाहनांमध्ये वाहन चालकाव्यतिरिक्त जास्तीत जास्त दोन प्रवासी असतील; दुचाकी वाहनांमध्ये मागच्या सिटवर व्यक्तिला बसता येणार नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *