Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

दारणा धरणातून शंभर वर्षांत पहिल्यांदाच गाळ उपसा; जलसाठा ७ टक्क्यांवर

Share

बेलगाव कुऱ्हे | लक्ष्मण सोनवणे

धरणांचा तालुका म्हणून इगतपुरी तालुका प्रसिद्द आहे. मराठवाड्याला पाणी पाजणारे ब्रिटिशकालीन दारणा धरण समूहात केवळ साडे सात टक्के जलसाठा शिल्लक आहे. यामुळे गेल्या वर्षी सर्वात आधी भरलेले दारणा धरणाने तळ गाठल्याने पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दारणा धरणाचा पाणी साठा वाढवण्यासाठी शंभर वर्षात पहिल्यांदा गाळ काढण्याचा उपक्रम पाटबंधारे विभागाचे अधीक्षक राजेश मोरे, उपविभागीय अधिकारी प्रमोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी अधिक सुपीक होऊन उत्पन्न वाढणार असल्याचे दारणा धरणाचे शाखा अभियंता एस.बी. पाटील यांनी देशदूतशी बोलताना सांगितले.

तालुक्याच्या पूर्व भागात मागील वर्षी सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान होऊन सर्व धरणे भरली होती मात्र ब्रिटिशकालीन दारणा धरणातून आक्टोंबर महिन्यात मराठवाडयाला पाणी सोडल्यामुळे येथील शेतकऱ्यांपुढे पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

मार्च महिन्यापासून पूर्वभागात दुष्काळी स्थिती पाहण्यास मिळत आहे. तालुक्यात दारणा धरणासह एकूण १३ छोटी मोठी धरणे असून दोन धरणे प्रस्तावित आहेत.

ती आता कोरडीठाक पडताना दिसत आहे. दरम्यान धरणांच्या जवळ राहणाऱ्या महिला पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करीत आहेत.

तालुक्याच्या पूर्वभागातील अनेक तरुणांना कंपन्यांमध्ये रोजगार मिळत नसल्याने ते आता शेतीकडे वळले आहेत मात्र शेतींच्या पिकांसाठी मुबलक प्रमाणात पाणी नाहीत म्हणून ते हतबल आहेत.

अतिदुर्गम आदिवासी तालुक्यात महामार्ग, एक रेल्वे मार्ग असणाऱ्या तालुक्याची स्थिती भूषणावह नक्कीच नाही. सर्व बाबतीत मोठ्या प्रमाणात त्याग करुनदेखील शेतकऱ्यांना एक ना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे.

महामार्ग, धरण, लष्कर हद्दी, रेल्वे मार्ग आदीसाठी शेकडो एकर जमीनी संपादित झाल्या आहेत येथील शेतकरी कसे बसे जीवन कंठीत आहेत. जे पिकवतात त्यालाही बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी कात्रीत सापडले आहेत. परिसरात शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात जनावरांची संख्या जास्त परंतु पाण्यामुळे चाराटंचाई जाणवत आहे.


दारणा धरणाची १०१ वर्षाकडे वाटचाल झाली असून धरणातील गाळ क काढण्याचे काम पहिल्यांदा प्रगतीपथावर सुरू आहे. यामुळे धरणातील जलसाठा वाढण्यास मदत मिळेल. जमिनी सुपीक बनविण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीत गाळ वापरण्यास परवानगी दिली आहे.
कार्यकारी अभियंता आर. एस. शिंदे, राजेंद्र शिंदे हे परिश्रम घेत आहेत.  शेतीसाठी असलेल्या या सुपीक गाळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.

एस. बी. पाटील, शाखा अभियंता दारणा धरण समूह

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!