Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

अधिवेशनातच मुख्यमंत्र्यांनी केल्या सात सनदी अधिका-यांच्या बदल्या!

Share

मुंबई | प्रतिनिधी 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी राज्यातील सात सनदी आधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत त्यात अरिबम शर्मा उपसचिव ग्रामविकास यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली या पदावर करण्यात आली आहे.

अश्विन मुदगल यांची नियुक्ती सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे. पी. सिवा संकर यांची नियुक्ती अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

सुनील चव्हाण यांची नियुक्ती सह-व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, औरंगाबाद या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

श्वेता सिंघल यांची नियुक्ती प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली. नयना गुंडे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित, पुणे यांची नियुक्ती उपमहासंचालक, यशदा, पुणे या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

ए. ए. गुल्हाणे यांची नियुक्ती प्रकल्प व्यवस्थापक, जलस्वराज, (2) नवी मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे. आर. एस. जगताप यांची नियुक्ती सह आयुक्त. विक्रीकर, औरंगाबाद या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!