Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नेट-सेट तयारीसाठी ‘सारथी’कडून स्टायपेंड; मराठा, कुणबी समाजातील नॉन क्रेमिलियर उमेदवारांना लाभ

Share

नाशिक । प्रतिनिधी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच ‘सारथी’तर्फे मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजातील नॉन क्रिमिलियर उमेदवारांना सेट-नेट या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी औरंगाबाद येथे निःशुल्क मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उमेदवारांना दरमहा तीन हजार रुपये ‘स्टायपेंड’ देखील देण्यात येणार आहे.

दरम्यान निवड झालेल्या सर्व उमेदवारांना पेपर 1 व 2 साठी मार्गदर्शन मिळणार आहे. यासाठीचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक 5 डिसेंबर आहे.

यासाठी https://www.sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे लागणार आहे. या योजनेच्या लाभासाठी उमेदवार हा राज्याचा मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजाचा असावा, उमेदवाराचे एकूण कौटुंबिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त नसावे (नॉन क्रिमिलेयर), उमेदवार हा सेट-नेट, सीएसआयर-यूजीसी नेट जून-2020 करिता पात्र असावा अशा अटी आहेत.

याशिवाय सारथीची पीएच.डी. साठी असलेली फेलोशिप मिळवण्यासाठी सेट-यूजीसी-नेट, सीएसआयआर-यूजीसी-नेट परीक्षा उतीर्ण असणे आवश्यक आहे.

सहायक प्राध्यापक या पदासाठी नेट / सेट उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. आयआयएम/ आयआयटीमधून पीएच. डी. करण्यासाठी प्रवेश परीक्षा ही अत्यंत कठीण असते. जर नेट / यूजीसी-नेट / सीएसआयआर-यूजीसी-नेट परीक्षा उतीर्ण असाल तर ही परीक्षा देण्यापासून आपणास सूट मिळते.

यूजीसी नेट यूजीसी-सीएसआयआरनेट-जेआरएफ झाल्यावर मिळणारी फेलोशिप ही महिन्यास जवळपास 35 हजार एवढी असते. वार्षिक विचार केल्यास ही रक्कम चार लाख 20 हजार एवढी होते. म्हणजेच पीएच. डी. करिता पाच वर्षे लागली तर एकूण 21 लाख रुपये फेलोशिप मिळू शकते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!