Friday, May 3, 2024
Homeनगरएकाचवेळी दोन जिल्ह्यांत सेवा; महिला डॉक्टरविरोधात अखेर गुन्हा

एकाचवेळी दोन जिल्ह्यांत सेवा; महिला डॉक्टरविरोधात अखेर गुन्हा

पारनेर |प्रतिनिधी| Parner

जवळा येथील रहिवासी असलेल्या डॉ. तेजश्री पोपटराव ढवळे यांनी जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी पदावर काम करत असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्र अळकुटी याठिकाणी देखिल समुदाय अधिकारी म्हणून काम करून 40 हजार रुपयांचे मानधन लाटल्याप्रकरणी व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

एकाचवेळी दोन ठिकाणी शासकीय नोकरी करून दोन्ही ठिकाणी मानधन घेऊन शासनाची फसवणूक केली आहे. मंगळवारी पारनेर पोलिस ठाण्यात भादवी कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधीची फिर्याद डॉ. संदीप साहेबराव देठे यांनी दिली आहे. डॉ. ढवळे यांनी 3 जून 2021 ते 30 जून 2021 रोजी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळवंडी व 1 जून 2021 रोजी ते 30 जून 2021 रोजी दरम्यान उपकेंद्र वडझिरे प्राथमिक आरोग्य केंद्र अळकुटी असे दोन ठिकाणी एकाच वेळी वैद्यकीय अधिकारी या पदावर शासकीय कर्तव्य बजावून शासनाकडून 40 हजार रुपये मानधन घेतले. यासबंधीचा अधिक तपास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक काळे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या