Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

शिंदे टोल नाक्यावर ट्रक चालकावर टोल कर्मचाऱ्यांकडून प्राणघातक हल्ला

Share

नाशिक । टोल देण्याच्या कारणावरून कुठलीही कायदेशीर कारवाई न करता ट्रक चालकाला बेकायदेशीर रित्या मारहाण करून प्राणघातक हल्ला करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊन यापुढे असे अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत टोल कर्मचाऱ्यांना समज देण्याची मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने शिंदे येथील टोल व्यवस्थापक सुनील हजारे यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री दिवाकर रावते व नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोमवार दि. २४ जून २०१९ रोजी रात्री उशिरा नाशिक तालुक्यातील शिंदे येथील टोल नाका येथे चालक संतोष हांडे आपले वाहन घेऊन जात असतांना शिंदे येथील टोल नाक्यावर थांबला असतांना टोल स्विकारण्यास कर्मचारी नसतांना तसेच बॅरिकेट लावलेले नसतांना टोल न भरता मार्गस्त झाला. या प्रकरानंतर शिंदे येथील टोल कर्मचाऱ्यांनी ट्रकचा पाठलाग करत गाडी थांबवून ट्रक चालकावर कायदेशीर कारवाई करण्याचे सोडून त्याला गाडीतून खाली खेचत बेदम मारहाण केल्याची निंदनीय घटना घडली आहे. या घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे.

पुढे म्हटले आहे की, शिंदे येथील टोल नाक्यावर या अगोदर देखील चालकांशी हुज्जत घालणे तसेच कायदेशीर कारवाई न करता मारहाण करण्याचे प्रकार घडले आहे. त्यामुळे चालकांच्या मनात तीव्र संताप आहे. त्यामुळे कारण नसतांना टोल नाक्यावरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून अनुचित प्रकार वारंवार घडत असल्याचे हा टोल वादग्रस्त होत असल्याचा बघावयास मिळत आहे. वास्तविक चालकांकडून टोल न भरल्याने त्याचा ट्रक टोल नाक्यानजीक थांबुवून ठेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. असे असतांना येथील कर्मचाऱ्यांनी चालकाला केलेली मारहाण ही निषेधार्ह असून याबात सबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड सेक्रेटरी सुभाष जांगडा, उपाध्यक्ष उत्तम कातकाडे, सुनील ढाने, बापू ताकाटे, नाना पाटील, संजू राठी ,विशाल पाठक यांच्यासह नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!