शेअर बाजारात आज २३१ अंकांची तेजी

0

मुंबई, ता. ४ : मागील आठवड्यात ३० हजाराचा आकडा पार केल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक पुन्हा घसरला होता.

आज मात्र बाजाराने पुन्हा बाळसे धरायला सुरुवात केली असून २३१ अंकांनी निर्देशांकात वाढ झाली.

आज ३०१२६ अंकांवर बाजार बंद झाला. तसेच निफ्टीसुद्धा ९३५९.९० अंकाच्या विक्रमी वाढीवर बंद झाला.

कंपन्यांच्या तिमाही अहवालात अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम आल्याने आज बाजाराने कात टाकल्याचे दिसून आले.

याशिवाय सरकारकडूनही बँकांमध्ये अडकलेल्या कर्जाच्या रकमेसंदर्भात ठोस उपाययोजना करण्याचे संकेत दिल्यानेही बाजारात तेजी आली.

LEAVE A REPLY

*