मुडीजच्या अहवालानंतर शेअर निर्देशांकाची जोरदार उसळी

0

मुंबई, ता. १७ :

मुडीज ने भारताचा पत दर (क्रेडिट रेटींग) सुधारल्याचे जाहीर केल्याबरोबर आज सकाळी मुंबई शेअर मार्केटमध्ये उत्साह संचारला.

बाजार उघडल्यानंतर लगेचच स्थानिक बाजारातील उलाढाल वाढल्याने शेअर निर्देशांक ४१४ अंकांनी उसळून ३३ हजार ५५१ वर पोहोचला. सकाळी ११.४० दरम्यान ३५१ अंकांची वाढ निर्देशांकानी नोंदविली होती. तर  निफ्टीसुद्धा १० हजार ३०० अंकावर पोहोचला.

जगभरातील देशांचे पत दर्जाचे मानांकन ठरविणाऱ्या अमेरिकन मुडीज या संस्थेने तब्बल १३ वर्षांनंतर भारताला बीएए२ या दर्जाचे पतदर (क्रेडिट रेटिंग) जाहीर केला आहे. या संस्थेने २००४ मध्ये भारताचे पत मानांकन बीएए३ असे जाहीर केले होते. बीएए३ हे मानांकन किमान गुंतवणूक श्रेणीचे होते. ते ‘जंक’ दर्जापेक्षा थोडे वरती होते. त्यानंतर या मुडिजने २०१५ मध्ये पतदर स्थिर वरून वाढवून सकारात्मक दर्जाचा केला होता.

LEAVE A REPLY

*